एस एम कृष्णा

परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णा यांचा राजीनामा

केंद्र सरकारमध्ये असलेले एस.एम.कृष्णा यांनी आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी होणा-या मंत्रीमंडळाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी त्यांनी हा राजीनामा दिल्याने चर्चेला ऊत आला आहे. त्यांच्यावर कर्नाटकची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

Oct 26, 2012, 04:28 PM IST

परराष्ट्रमंत्र्यांचं ‘पाक’प्रेम...

भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा देशाच्या सुरक्षेशी खेळ करणारे भयंकर करार का करत आहेत? त्यांनी वारंवार पाकचे दौरे का करावेत? पाकिस्तानने असे नेमके काय केले की परराष्ट्रमंत्र्यांना पाकिस्तानच्या ‘प्रेमा’चा पान्हा फुटावा?

Sep 13, 2012, 10:08 AM IST

समुद्र नाही चीनच्या बापाचा - भारताने फटकारले

दक्षिण चीनमधील समुद्र ही जगाची संपत्ती असून त्यास व्यापारासाठी मुक्त केले जावे, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी म्हटले आहे. दक्षिण चीनचा समुद्र कोणाची जागीर नाही, असे सडेतोड उत्तर कृष्णा यांनी चीनला दिले आहे.

Apr 6, 2012, 08:47 PM IST

भारत-पाकमध्ये विश्वास दृढ - परराष्ट्रमंत्री

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी पाकिस्तानबद्दलचा विश्वास वाढत असल्याचे वक्तव्य केलंय.

Nov 9, 2011, 11:16 AM IST