उत्तर प्रदेश

कोणीतरी माझी किडनी खरेदी करा, मुलांच्या शिक्षणासाठी आईची आर्त साद

एका चार मुलांच्या आईवर आभाळ कोसळलेय. मुलांच्या शिक्षणासाठी तिने टोकाचे पाऊल उचललेय. स्वत:ची किडनी विक्रीला काढलेय.  

Jun 1, 2017, 06:31 PM IST

'ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट टू मोदी'

निवडणुकीतल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फो़डणा-यांना योगी आदित्यनाथ यांनी जोरदार उत्तर दिलंय.

Apr 30, 2017, 05:46 PM IST

लग्नात नॉन व्हेज मागणं मुलाला पडलं महाग

मांसहारी जेवण नसल्यामुळे मंडपामध्ये लग्नाला केलेला विरोध नवरदेवाला चांगलाच महागात पडला आहे.

Apr 27, 2017, 11:36 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीच्या १५ सुट्ट्या बंद

उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या १५ सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं घेतला आहे. 

Apr 25, 2017, 08:43 PM IST

उत्तर प्रदेशात लाल आणि निळा दिवा पूर्णपणे संपुष्टात

उत्तर प्रदेशमध्ये व्हीव्हीआयपी संस्कृती पूर्णपणे संपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने राज्यातील लाल दिवा आणि निळा दिवा पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 21, 2017, 09:08 AM IST

जेव्हा रसगुल्ल्यावरुन लग्न मोडते...

हे केवळ उत्तर प्रदेशातच घडू शकते. हुंड्याच्या कारणामुळे अथवा नवरामुलाच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे लग्न मोडतात असे आपण ऐकले होते. मात्र उत्तर प्रदेशात चक्क एक्स्ट्रा रसगुल्ल्यामुळे लग्न मोडल्याची घटना घडलीये.

Apr 18, 2017, 07:49 PM IST

तीन तलाखविषयी शांतता बाळगणारेही अपराधी - योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन तलाखवरून चिड व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, देशातील एक तृतीयांश लोकं तीन तलाख मुद्द्यावर गप्प आहेत. या विषयावर शांतता बाळगणारेही अपराधी आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

Apr 17, 2017, 01:25 PM IST

उत्तर प्रदेशच्या विभाजनाला योगींचा नकार

उत्तर प्रदेशच्या विभाजनाला नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट नकार दिला आहे. हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्य़नाथांनी हे मत मांडलंय. स्वतः ज्या गोरखपूरचे आहेत तेथूनच पूर्वांचल नावाचं स्वतंत्र राज्य करण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. शिवाय छोटी राज्य बनवणे ही भाजपची राष्ट्रीय भूमिकाही आहेच असं असूनही योगी आदित्य नाथ मात्र या मागणीच्या विरोधात आहे.

Apr 8, 2017, 11:05 PM IST

'मोगली गर्ल'ची कहाणी, ८ वर्षीय मुलगी जंगलात माकडांसोबत!

मोगली तुम्हा आम्हाला आठवत असेल. अशीच एक मोगली गर्ल उत्तर प्रदेशातल्या जंगलात सापडलीय. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती माकडांसोबत जंगलात रहात होती. ती जंगलात कशी पोहचली, कधीपासून ती माकडांसोबत राहतेय, या सा-याचा शोध पोलीस घेत आहे. तर तिच्यावर उपचार करून तिला सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी डॉक्टर्स मदत करतायत. 

Apr 7, 2017, 07:54 PM IST

उत्तर प्रदेश कर्जमाफी मॉडेलचा राज्य सरकार अभ्यास करणार- मुख्यमंत्री

 उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर राज्यातही शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे. 

Apr 5, 2017, 05:41 PM IST