'ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट टू मोदी'

निवडणुकीतल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फो़डणा-यांना योगी आदित्यनाथ यांनी जोरदार उत्तर दिलंय.

Updated: Apr 30, 2017, 05:46 PM IST
'ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट टू मोदी' title=

गोरखपूर : निवडणुकीतल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फो़डणा-यांना योगी आदित्यनाथ यांनी जोरदार उत्तर दिलंय. ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट टू मोदी असं वक्तव्य आदित्यनाथ यांनी केलं आहे. गोरखपूरच्या आपल्या दुस-या दौ-यात त्यांनी ईव्हीएमवर सवाल उपस्थित करणा-यांना टीकेचं लक्ष्य केलंय.  

उत्तर प्रदेश निवडणूक निकालानंतर दिल्ली पालिका निवडणुकीतही कमळ फुललं. याचं सगळ श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं असं योगी आदित्यनाथ म्हणालेत. मोदींनी जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली आणि त्यामुळेच प्रत्येक मत मोदींसाठी होत असल्याचेही ते म्हणालेत.