लखनऊ : एका चार मुलांच्या आईवर आभाळ कोसळलेय. मुलांच्या शिक्षणासाठी तिने टोकाचे पाऊल उचललेय. स्वत:ची किडनी विक्रीला काढलेय. कोणीतरी माझी किडनी खरेदी करा आणि माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावा, अशी आर्त साद पीडित महिलेने घातलेय.
मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने उत्तरप्रदेशमध्ये राहणारी या माऊलीचे नाव आहे आरती शर्मा. तिने फेसबुकवर किडनी विक्रीची जाहीरात दिली आहे. या महिलेच्या पदरात तीन मुली आणि एक मुलगा आहे. ग्वॉलियअर रोडवर इको कॉलनीमध्ये आरती तिच्या आठ जणांच्या कुटुंबासोबत राहते.
आरतीने मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची याचना केली आहे. आरतीने सांगितले पती मनोज शर्माचा छोटा गारमेंटचा व्यवसाय होता. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांचा व्यवसाय बुडाला. त्यामुळे हा आर्थिक ओढातान सुरु आहे. आपण जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली. मात्र, काहीही उपयोग झालेला नाही.
आरती यांची मुले इंग्लिश मेडियममध्ये सीबीएसईच्या शाळेत शिकत आहे आहे. मात्र, तीन महिन्यांपूर्वी फी न भरल्याने तीन मुलींना आणि मुलाला शाळेतून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या शिक्षणावर संकट ओढवले आहे.
बॅंकेकडे कर्जासाठी गेलो. पण तिथेही पदरी निराशा आली. मुख्यमंत्री योगी यांची भेट घ्यायची होती. पैसे नव्हते म्हणून घरातील सिलिंडर विकला आणि त्यांना परिस्थिती सांगतली. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. मात्र, आजतागायत मदत मिळालेली नाही. त्यामुळे हे पाऊल उचल्याचे आरती यांनी सांगितले.
Agra (UP): Mother offers to sell kidney for her 4 kid's studies, claims demonetisation hit their business & CM didn't help despite assurance pic.twitter.com/VdBazz6Mb6
— ANI UP (@ANINewsUP) June 1, 2017
नोटाबंदीपूर्वी आमचे कुटुंब सुखात होते. आमची मुले चांगले आयुष्य जगत होती. आम्ही गरीबांना मदतही करायचो. आम्ही वाईट काळात दुसऱ्यांच्या मुलींना मदत केली पण आता माझ्या मुलांना मदत करायला कोणीही पुढे येत नाही, अशी व्यथा आरती यांनी यावेळी मांडली.
किडनी विकायचा निर्णय आरतीचा होता. मी टॅक्सी चालवून महिन्याला ४ ते ५ हजार रुपये कमावतोय. घरमालकाने आम्हाला घर रिकामी करायला सांगितलेय पण जायचे कुठे हा प्रश्न आहे असे पती मनोजने सांगितले. कर्ज मागितले, पण अधिकारी आम्हाला खजिल करतात, असे ते म्हणालेत.