कुठे गेले ते आयपीएलचे चमचमते सितारे?
ओपनिंग सेरेमनी वगळता आयपीएलच्या या सीझनमध्ये क्रिकेटप्रेमींना आकर्षित करेल असं काहीच घडलं नाही. प्रीती झिंटा आणि शिल्पा शेट्टी या ग्लॅमरस चेहऱ्यांचा भावही उतरला आहे.
Apr 8, 2012, 01:48 PM ISTदिल्ली डेअरडेव्हिल्सने टॉस जिंकला
आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि बंगळूरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात आज शनिवारी लढत होत आहे. दिल्लीचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Apr 7, 2012, 05:38 PM ISTदिंडाने उडवली मुंबईची दांडी!
पहिल्या सामन्यात चेन्नईला धूळ चारणाऱ्या मुंबई इंडियन्सला पुणे वॉरियर्सने त्यांच्या भूमीत पाणी पाजले. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे मुंबई इंडियन्स २९ धावांनी पराभव पत्कारावा लागला. अशोक दिंडाची चमकदार कामगिरीमुळे पुण्याचा विजय सूकर झाला.
Apr 6, 2012, 09:00 PM ISTमुंबई इंडियन्सला १३० रन्सचे टार्गेट
दादा सौरभ गांगुलीच्या पुणे वॉरियर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १३० रन्सचे टार्गेट दिले आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुंबई संघात समावेश नाही. त्याच्याऐवजी सूर्यप्रताप यादवला संधी देण्यात आली आहे.
Apr 6, 2012, 06:03 PM ISTकोण होणार आयपीएलमधील मोठा हिटर?
टी-20 महासंग्रामात विजय हा बॅट्समनचाच होतो. प्रत्येक टीमची भिस्त ही टीमला विजय मिळवून देणा-य़ा चेह-यांवर असते. असे बॅट्समन जे वारंवार बॉल बाऊंड्रीच्या पार पाठवतील. आयपीएलमध्ये ख्रिस गेल पासून ते विराट कोहलीमध्ये सगळ्यात मोठा हिटर कोण ही स्पर्धा लागणार आहे.
Apr 5, 2012, 07:51 PM ISTआज वीरूला 'गंभीर आव्हान'
वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे दोन मित्र आता एकमेकांवर वार करायला सिध्द झाले आहेत. सेहवागच्या कॅप्टन्सीखालील दिल्ली डेअरडेविल्स आणि गंभीरच्या कॅप्टन्सीखालील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रणसंग्राम पहायला मिळणार आहे.
Apr 5, 2012, 02:57 PM ISTताऱ्यांची भेट : अमिताभ आणि रजनीकांत
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या उद्घाटनासाठी चेन्नई येथे गेले असता, त्यांनी दक्षिणेचे मेगास्टार ‘रजनीकांत’ यांची भेट घेतली.. रजनीकांत यांची तब्येत बरी झालेली पाहून अमिताभ यांनी आनंद व्यक्त केला.
Apr 4, 2012, 03:21 PM ISTIPL: लालूंच्या मुलाला न खेळता ४० लाख
माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुलाला आयपीएलची कृपा झाली आहे. त्याला सामना न खेळता ४० लाख रूपये मानधन मिळाले आहे. लालूंचा मुलगा तेजस्वी यादव हा दिल्ली डेयरडेविल्सच्या संघात आहे.
Mar 29, 2012, 04:49 PM IST"राष्ट्रीय टी-२० IPL इतक्याच महत्त्वाच्या"- हरभजन
टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग याच्या मते राष्ट्रीय ट्वेंटी-२० चँपियनशिप ही देखील आयपीएलइतकीच महत्त्वाची आहे. कारण या मॅचेसमधून खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरील सिलेक्टर्सना प्रभावित करता येऊ शकतं. आणि आयपीएलमध्ये सामील होण्याची संधी मिळू शकते.
Mar 24, 2012, 05:39 PM ISTराजस्थान रॉयल्स संघ विक्रीला
आयपील स्पर्धेत चांगली कामगिरी न झाल्याने राजस्थान रॉयल्स संघपुढे प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. संघाचा खर्च उचलने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कठीण होत आहे. त्यामुळे आर्थिक डबघाईला आलेला राजस्थान रॉयल्स संघ विक्रिलाच काढवा लागला आहे. त्यामुळे हा संघ कोण विकत घेणार याकडे लक्ष लागले आहे.
Mar 24, 2012, 10:08 AM ISTटीम इंडिया झाली 'बेसहारा'
टीम इंडियाचे प्रायोजकत्व मागे घेतानाच, आयपीएलमधील पुणे वॉरियर या संघाची मालकी सोडण्याची घोषणाही सहारा उद्योगसमूहाने केली आहे. त्यामुळे पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या टीम इंडियावर 'बेसहारा' होण्याची वेळ आली आहे.
Feb 4, 2012, 11:15 AM ISTआयपीएल खेळाडूंचा फेब्रुवारीत लिलाव
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पाचव्या सत्रासाठी बंगळूरमध्ये खेळाडूंचा लिलाव होईल. हा लिलाव चार फेब्रुवारीला होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.
Jan 27, 2012, 11:30 AM ISTपुणे वॉरिअर्सची धुरा 'दादांवर'
आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या पुणे वॉरिअर्सच्या प्रशिक्षकाची कमान आता टीम इंडियाचा बेधड माजी कर्णधार सौरव गांगुली संभाळणार आहे. त्याच्यातील आक्रमकता पुणे वॉरिअर्स संघाच्या अंगी येईल का, याचीच उत्सुकता आहे. सौरव गांगुली हा आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी पुणे वॉरिअर्स संघाच्या प्रशिक्षकांमध्ये समावेश केला आहे.
Jan 21, 2012, 03:56 PM IST'आयपीएल'पेक्षा 'बिग', म्हणे पाकची प्रीमियर लीग !
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड(पीसीबी) लवकरच स्वतःची प्रीमियर लीग सुरू करणार असून ही प्रीमियर लीग आयपीलपेक्षा मोठी असणार आहे असं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष चौधरी झाका अश्रफ यांनी केलं आहे.
Jan 4, 2012, 09:53 PM IST