दिल्ली डेअरडेव्हिल्सने टॉस जिंकला

आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि बंगळूरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात आज शनिवारी लढत होत आहे. दिल्लीचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Updated: Apr 7, 2012, 05:38 PM IST

www.24taas.com, बंगळूरू 

आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि बंगळूरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात आज शनिवारी लढत होत आहे. दिल्लीचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएलच्या पाचव्या मोसमातील बंगळूरूचा हा पहिला सामना आहे. तर, दिल्लीने पहिल्या सामन्यात कोलकताचा पराभव केला होता. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात बंगळूरू संघात वेस्टइंडीजचा स्फोटक सलामीवीर ख्रिस गेल दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये थोडी निराशा आहे.