www.24taas.com ,मुंबई
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पाचव्या सत्रासाठी बंगळूरमध्ये खेळाडूंचा लिलाव होईल. हा लिलाव चार फेब्रुवारीला होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.
या लिलाव प्रक्रियेत फ्रॅंचाईजी संघ मागील प्रक्रियेप्रमाणेच सहभागी होतील. आयपीएल स्पर्धेला ४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. उद्घाटनाचा सामना चेन्नईत खेळला जाईल. कोची टस्कर्स, केरळ संघाला बरखास्त केल्यानंतर या स्पर्धेत नऊ संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली.
दरम्यान, आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या पुणे वॉरिअर्सच्या प्रशिक्षकाची कमान आता टीम इंडियाचा बेधड माजी कर्णधार सौरव गांगुली संभाळणार आहे. त्याच्यातील आक्रमकता पुणे वॉरिअर्स संघाच्या अंगी येईल का, याचीच उत्सुकता आहे.सौरव गांगुली हा आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी पुणे वॉरिअर्स संघाच्या प्रशिक्षकांमध्ये समावेश केला आहे. तर ऍलन डोलाल्ड यांचा संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक, तर सौरव गांगुली खेळाडू आणि मेंटर अशी दुहेरी भूमिका निभावणार आहे. असे असले तरी यंदाच्या मोसमात पुणे वॉरिअर्सचा संघ प्रशिक्षकाविना खेळणार आहे.