IRCTCचं रेल्वे प्रवाशांना गिफ्ट, मिळणार स्वस्त रेल्वे तिकीट
ऑनलाईन रेल्वे तिकीटचं बुकिंग आता न सोपं होणार आहे सोबतच तिकीट स्वस्तही होणार आहे. आयआरसीटीसीनं नुकतीच आपल्या वेबसाईटवर आरडीएस सुविधा सुरू केली आहे. ज्याद्वारे ग्राहक सरळ रिझर्वेशन करू शकतात आणि या पद्धतीन तुमच्या बँकेतून तेव्हाच पैसे कट होतील, जेव्हा रिझर्वेशन झालेलं असेल.
Aug 6, 2014, 04:55 PM ISTरेल्वेच्या जेवणात झूरळ, IRCTCवर कारवाई
नवी दिल्ली- कोलकाता राजधानी एक्सप्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात झूरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी राबवलेल्या विशेष मोहीमेत ही गंभीर बाब समोर आली असून या निष्काळजीपणासाठी रेल्वेने गाडीत कॅटरिंग सुविधा देणाऱ्या इंडियन कॅटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशनवर (आयआरसीटीसी) कारवाईचा बडगाही उगारला आहे.
Aug 3, 2014, 06:16 PM ISTएक एसएमएस करणार रेल्वे तिकीट बुक!
आता केवळ एका एसएमएसच्या साहाय्यानं तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. ई-तिकिटानंतर आता `इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन`नं एसएमएसची सुविधाही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
Jun 12, 2013, 09:58 AM ISTरेल्वेचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा! IRCTCची फसवणूक
सर्वसामान्य माणसांचे पैसे लुटण्यात ‘रेल्वे’ही सुसाट निघाली आहे. टिकिट खिडकीवर सुट्टे पैसे नसल्याचं कारण देत प्रत्येक तिकिटामागे चार रुपये जास्त घेणं आता कायदेशीर करून टाकलं आहे. याहून मोठी गोष्ट म्हणजे रेल्वेची वेबसाइट असणाऱ्या IRCTC वर ऑनलाइन रिझर्वेशन करतानाही बँक अकाउंटमधून राऊंड फिगरने पैसे कापले जात आहे.
Feb 5, 2013, 02:36 PM ISTअनधिकृत रेल्वे बुकिंगवर आता रेल्वेची नजर
दुसऱ्याच्या नावावर आरक्षित तिकीटावर प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या आणि ऑनलाईन बुकिंगचा अनधिकृत एजंट घेत असलेला गैरफायदा समोर आल्याने आता आयआरसीटीने त्यावरही वॉच ठेवण्यास सुरूवात केली आहे
Nov 9, 2012, 05:18 PM ISTरेल्वे तिकिट होणार मोबाईलवर बुक!
भारतीय रेल्वे आता अजून अपडेट होणार आहे. रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी आता नवी प्रणाली सुरू करण्यात येणरा असून या नव्या प्रणालीनुसार इंटरबँक मोबाईल पेमेंट सेवा (आयएमपीएस) चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट तुम्ही मोबाईलवरूनही बुक करू शकतात.
Sep 14, 2012, 09:54 PM IST