www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय रेल्वे आता अजून अपडेट होणार आहे. रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी आता नवी प्रणाली सुरू करण्यात येणरा असून या नव्या प्रणालीनुसार इंटरबँक मोबाईल पेमेंट सेवा (आयएमपीएस) चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट तुम्ही मोबाईलवरूनही बुक करू शकतात.
आयआरसीटीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्याकडे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगची सुविधा नसेल तर तुम्ही मोबाईलच्या आयएमपीएस प्रणाली वापरून आपले ई-तिकीट बुक करू शकतात.
आयआरसीटीसीच्या माध्यमातून रोज चार लाख ई-तिकिटांचे बुकिंग केले जाते. ई-तिकिटांची बुकिंग करताना ग्राहक कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगची सुविधेचा वापर करतात. या अजून एक पर्याय जोडला जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुरूवातीला इंटरनेटच्या माध्यमातून आयएमपीएस सेवा ग्राहक वापरू शकतात. परंतु, काही काळानंतर ही सेवा मोबाईलद्वारेही वापरता येणार आहे. आयएमपीएस या माध्यमातून २४ तासात एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कधीही पैसे ट्रान्सफर करता येतात.
या खेरीज आयआरसीटीसी रोलिंग डिपॉझिट स्किम म्हणजे कोणताही व्यक्ती या प्रणालीत रेल्वेकडे पूर्वीच काही पैसे डिपॉझिट करून त्याद्वारे आपले तिकीट बुक करू शकतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.