आता फोनवरून करा रिझर्व्हेशन, IRCTCचं अँड्रॉइड फोनसाठी नवं अॅप

आयआरसीटीसीनं गूगल प्ले स्टोअरमध्ये आपलं अधिकृत अँड्रॉइड अॅप उपलब्ध करून दिलंय. यासा IRCTC Connect असं नाव देण्यात आलंय. हे अॅप फ्री आहे आणि यात अनेक सुविधा आहेत. 

Updated: Oct 13, 2014, 05:21 PM IST
आता फोनवरून करा रिझर्व्हेशन, IRCTCचं अँड्रॉइड फोनसाठी नवं अॅप title=

नवी दिल्ली: आयआरसीटीसीनं गूगल प्ले स्टोअरमध्ये आपलं अधिकृत अँड्रॉइड अॅप उपलब्ध करून दिलंय. यासा IRCTC Connect असं नाव देण्यात आलंय. हे अॅप फ्री आहे आणि यात अनेक सुविधा आहेत. 

यात प्रवासी कोणत्याही ट्रेनचं तिकीटांची स्थितीची माहिती घेऊ शकतात आणि तिकीट काढू शकतात. रिझर्व्हेशन करणं किंवा रद्द करण्याची सोय अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलीय. एवढंच नव्हे तर प्रवाशाला प्रवासाबद्दलचे सर्व अलर्ट्स मिळतील. 

आयआरसीटीसीनुसार हे अॅप वेबसाइटवरून लॉग इन करून यूजरचं नवं अकाऊंट बनवण्यास मदत करतो. याशिवाय IRCTC कनेक्ट प्रवाशानं नुकत्याच केलेल्या रिझर्व्हेशनचे डिटेल्सही ठेवतं. त्यामुळं पुन्हा पुन्हा तुम्हाला ती माहिती भरावी लागत नाही. 

हे अॅप दररोज सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत काम करणार नाही. कारण यावेळेदरम्यान यूजरला IRCTCच्या वेबसाइट किंवा स्टेशनहून रिझर्व्हेशन करावं लागतं. हे अॅप वापरायला खूप सोपी आहे आणि यात संपूर्ण माहिती मिळेल. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.