नवी दिल्ली: ऑनलाईन रेल्वे तिकीटचं बुकिंग आता न सोपं होणार आहे सोबतच तिकीट स्वस्तही होणार आहे. आयआरसीटीसीनं नुकतीच आपल्या वेबसाईटवर आरडीएस सुविधा सुरू केली आहे. ज्याद्वारे ग्राहक सरळ रिझर्वेशन करू शकतात आणि या पद्धतीन तुमच्या बँकेतून तेव्हाच पैसे कट होतील, जेव्हा रिझर्वेशन झालेलं असेल.
आयआरसीटीसीला खूप काळापासून रिझर्वेशन दरम्यान गडबड होत असल्याची तक्रार मिळत होती. यात तिकीट बुक झालं नसतांनाही कधी कधी तुमच्या बँक खात्यातून पैसे कट व्हायचे. शिवाय बँक आपला सर्विस टॅक्सही कापून ग्राहकांना भूर्दंड पडायचा. मात्र यावरच उपाय करत आयआरसीटीसीनं ग्राहकांसाठी रुलिंग डिपॉझिट स्कीम (आरडीएस)ची सुविधा सुरू केलीय.
या स्कीम अंतर्गत प्रवास करणाऱ्या ग्राहकांना वेबसाईटवर आपली रिक्वेस्ट पाठवेल. त्यात आपलं खातं आणि बँक खात्याचे डिटेल्स मागितले जातील. ही माहिती देताच ग्राहकाला आरडीएस सुविधा मिळेल. ग्राहकाला गोपनीय पासवर्ड उपलब्ध करून दिलं जाईल. रिझर्वेशन दरम्यान ग्राहक वेबसाईटवर जावून आरडीएस ऑप्शन निवडून सरळ तिकीट बुक करू शकतील. पहिल्यासारखी आता बँकेची आणि इतर वैय्यक्तिक माहिती देण्याची गरज राहणार नाही. तिकिट बुक झाल्यानंतर आपोआप खात्यातून रक्कम कट होईल.
याशिवाय आतापर्यंत आरआयसीटीसीवर ऑनलाईन तिकीट बुक करतांना 10 रुपये बँक सर्विस टॅक्स प्रत्येकी तिकीटवर चार्ज म्हणून कट केला जायचा. मात्र नव्या सुविधेत हा चार्जही कमी केला जाणार आहे. आता 2000 रुपयांच्या तिकीटावर 0.75 टक्के आणि याहून अधिक तिकीटावर 1 टक्के चार्ज कट केला जाईल. म्हणजे 1000 रुपयांच्या तिकीटावर 7.50 रुपये शुल्क आकारलं जाईल. महागाईच्या या परिस्थितीत आयआरसीटीसीची ही सुविधा निश्चितच रेल्वे प्रवाशांसाठी आनंददायक ठरेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.