IRCTCच्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला बुक होणार 7200 तिकीट

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला तब्बल 7200 तिकीट बुक करता येणार आहे. कारण तिकीट बुकिंगची प्रक्रिया जलद झालीय.

Updated: Aug 14, 2014, 05:36 PM IST
IRCTCच्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला बुक होणार 7200 तिकीट title=

नवी दिल्ली: ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला तब्बल 7200 तिकीट बुक करता येणार आहे. कारण तिकीट बुकिंगची प्रक्रिया जलद झालीय.

रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी नवीन पद्धीतीची ई-तिकीटींगची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सांगितलं, रेल्वे बजेटमध्ये दिलं गेलेलं हे आश्वासन होतं, जे की सरकारनं आता पूर्ण केलंय. 

‘सेंटर फॉर रेल्वे इंन्फॉर्मेशन सिस्टम’च्यावतीनं तयार केली गेलेल्या या नव्या तंत्राला 180 कोटी रुपयांचा खर्च आलाय. जुन्या पद्धतीत 2 हजार तिकीटांच्या तुलनेत 7200 तिकीटं प्रति मिनीटाला बुक होऊ शकेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.