अमरनाथ दहशतवादी हल्ला

अमरनाथ दहशतवादी हल्ला: मृत्यूच्या दारातून 'ते' परतले

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर १० जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यात महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोन महिलांचा समावेश होता. तसेच या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. या जखमींमध्ये पालघरमधील डोंगरे कुटुंबीयही आहेत.

Jul 20, 2017, 10:28 AM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या ८ वर

अमरनाथच्या यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील मृतांची संख्या ८ वर गेली आहे. रात्री उपचारादरम्याने गुजरातच्या ललिता बेन यांचा मृत्यू झाला आहे.  

Jul 16, 2017, 11:43 AM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूडकरांची संतप्त प्रतिक्रिया

अमरनाथच्या भाविकांवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडने आपला तीव्र संताप दर्शवला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी अनंतनागमधून भाविक अमरनाथ यात्रा करून परत येत असतांना दहशतवादयांनी थेट त्यांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला तर १५ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Jul 11, 2017, 03:34 PM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्रालयाची तातडीची बैठक

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्रालयाने तातडीची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख आणि गृह सचिव उपस्थित होते. आयबीने वारंवार सतर्कतेचा इशारा दिल्यानंतरही हल्ला कसा झाला, यावर बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं आहे.

Jul 11, 2017, 01:22 PM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ला, पालघरचे दोघे ठार

काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले आहेत. या महाराष्ट्रातील पालघरच्या दोन भाविकांचा समावेश आहे.

Jul 11, 2017, 08:51 AM IST