अमरनाथ दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूडकरांची संतप्त प्रतिक्रिया

अमरनाथच्या भाविकांवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडने आपला तीव्र संताप दर्शवला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी अनंतनागमधून भाविक अमरनाथ यात्रा करून परत येत असतांना दहशतवादयांनी थेट त्यांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला तर १५ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Updated: Jul 11, 2017, 03:34 PM IST
अमरनाथ दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूडकरांची संतप्त प्रतिक्रिया title=

मुंबई : अमरनाथच्या भाविकांवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडने आपला तीव्र संताप दर्शवला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी अनंतनागमधून भाविक अमरनाथ यात्रा करून परत येत असतांना दहशतवादयांनी थेट त्यांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला तर १५ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

सोमवारी रात्री ८.२० मिनिटांनी हा हल्ला झाला. अनेक जखमींची प्रकृती खूपच नाजूक आहे. त्यांना अनंतनाग आणि श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. या हल्ल्याची बातमी येताच बॉलिवूडकरांनी तीव्र राग सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अक्षय कुमार, फरहान अख्तर, रितेश देशमुख, हुमा कुरैशी, महेश भट्ट, अनुपम खैर आणि वरून धवन या सगळ्या सेलिब्रिटींनी टीका आणि निषेध करत तीव्र राग व्यक्त केला.