'या' क्रिकेटरची चाहती आहे अभिनेत्री जरीन खान

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्यातील अफेअर्सच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यात एक खास कनेक्शन असल्याचं पहाण्यास मिळालं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 8, 2017, 05:14 PM IST
'या' क्रिकेटरची चाहती आहे अभिनेत्री जरीन खान  title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्यातील अफेअर्सच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यात एक खास कनेक्शन असल्याचं पहाण्यास मिळालं आहे.

मंसूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर यांच्यापासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या अफेअरपर्यंत अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत.

आता बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने आपल्या आवडत्या क्रिकेटरसंदर्भात खुलासा केला आहे. अभिनेत्री जरीन खानला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली किंवा एम एस धोनी नाही तर पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीची खूप मोठी चाहती आहे.

अनेकांना प्रश्न पडला आहे की, जरीन खानने अचानक आपल्या आवडत्या क्रिकेटरसंदर्भात खुलासा कसा केला?. पण झालं असं की, जरीन खान आगामी टी-१० क्रिकेट लीगमध्ये पख्तूंस टीमची सेलेब्रिटी अॅम्बेसेडर आहे. या लीगमध्ये प्रत्येक इनिंग १० ओव्हर्सची असणार आहे. वीरेंद्र सेहवाग, इयॉन मॉर्गन, क्रिस गेल, शाकिब अल हसन आणि कुमार संगकारा सारखे अनेक स्टार क्रिकेटर्स या लीगमध्ये सहभागी होणार आहेत.

शाहिद आफ्रिदीही या लीगमध्ये सहभागी होणार आहे. शाहिद पख्तूंस टीमसाठी खेळणार आहे. अभिनेत्री जरीनने सांगितले की, शाहिद आफ्रिदीने ज्यावेळी पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये खेळण्यास सुरुवात केली तेव्हापासून ती त्याची चाहती झाली आहे. आता शाहिद आफ्रिदी पख्तूंस टीमचा हिस्सा असल्याने जरीनला आणखीनच आनंद झाला आहे.

जरीनने पूढे म्हटलं की, मला शाहिद आफ्रिदीचा लूक, हेअरस्टाईलही मला खूप आवडते. ज्यावेळी फ्रँचाईजीने मला सांगितले की अफ्रिदी या टीममध्ये खेळणार आहे त्यावेळी मी म्हटलं की, मला सुद्धा खेळण्याची परवानगी द्या.