Yuvraj Singh: वनडे क्रिकेट संपतंय का? मैदानावरून युवराज सिंहने व्यक्त केली चिंता!

Yuvraj Singh Tweet: पहिल्या सामन्यात शुभमनने शतक (Century) साजरं केल्यानंतर युवराजने युवा शुभमनचं तोंडभरून कौतूक केलं. त्यावेळी युवराजने एक सवाल उपस्थित केला. युवराजच्या प्रश्नाने अनेकांना विचार करायला भाग पाडलंय.

Updated: Jan 16, 2023, 01:30 AM IST
Yuvraj Singh: वनडे क्रिकेट संपतंय का? मैदानावरून युवराज सिंहने व्यक्त केली चिंता! title=
Yuvraj Singh

Yuvraj Singh: टीम इंडियाला (Team India) आत्तापर्यंत रिप्लेसमेंट न मिळालेला खेळाडू म्हणजे युवराज सिंह (Yuvraj Singh)... 6 फूट 5 इंच उंचीचा धिप्पाड लेफ्ट हॅडर युवराज ज्यावेळी एका पायावर पुढे येऊन लाँग ऑफच्या दिशेने षटकार खेचतो, तो क्षण नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. क्रिकेटमधून (Cricket) निवृत्ती घेतल्यानंतर त्याने नवी इनिंग सुरूवात केली. युवराज सारखा दुसरा खेळाडू मिळालाच नाही. युवराज फार क्वचित वेळा चर्चेत दिसतो. मात्र, त्याच्या चाहत्यांचं प्रेम अजूनही कमी झालं नाही. (Yuvraj Singh Tweet Is ODI cricket over Yuvraj Singh expressed concern from the field marathi news)

सध्या युवराज पुन्हा चर्चेत आलाय. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिलने (Shubhaman Gill) शतक मारलं. या सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. पहिल्या सामन्यात शुभमनने शतक (Century) साजरं केल्यानंतर युवराजने युवा शुभमनचं तोंडभरून कौतूक केलं. त्यावेळी युवराजने एक सवाल उपस्थित केला. युवराजच्या प्रश्नाने अनेकांना विचार करायला भाग पाडलंय.

पाहा ट्विट - 

शुभमननं शतक केल्यानंतर युवराजने ट्वीट (Yuvraj Singh Tweet) करत शुभेच्छा दिल्या, शुभमनला टॅग करत त्याची पाठ थोपटली. दमदार शतक मारलंस कोहलीही दुसऱ्या बाजूला उत्तम खेळत होता. पण मला चिंता एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे केवळ अर्ध भरलेलं स्टेडियम. एकदिवसीय क्रिकेट संपत आहे का?, अशी चिंता युवराजला वाटते.

आणखी वाचा - Shaun Tait: हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला..; आधी ट्विटने खळबळ नंतर सारवासारवी!

मागील काही दिवसांपासून टी-ट्वेंटी (T20) क्रेझ वाढल्याचं पहायला मिळतंय. सूर्यकुमार सारख्या फलंदाजांनी नवी फॅन्टसी निर्माण केली. तसेच गोलंदाजांची धार देखील कमी झाल्याची चर्चा सुरू असते, अशातच आता टेस्ट क्रिकेट (Test Cricket) आणि वनडे (ODI) सामन्यासाठीची आवड कमी झालीये, असं दिसतंय. त्यामुळे युवराज खरं तर बोलतोय, अशी चर्चा नेटकरी करत आहेत.

दरम्यान, युवराजच्या ट्विटवर माजी अष्टपैलू इरफान पठाणने (Irfan Pathan) मजेशीर उत्तर दिलं. युवराजच्या ट्विटला रिट्विट करत इरफान म्हणतो, युवराज चल तूच पॅड घालून मैदानात खेळायला ये म्हणजे आपोआप लोकं स्टेडियमवर येतील. इरफानच्या ट्विटला देखील अनेक लाईक्स मिळताना दिसत आहे.