...म्हणून श्रीलंकेच्या 9 विकेट्स असताना टीम इंडियाला विजयी घोषित केलं, जाणून घ्या!

अनेक क्रिकेट चाहत्यांना असा प्रश्न पडला की श्रीलंका संघाच्या 9 विकेट्स गेल्या होत्या तरीही श्रीलंका संघाला ऑलआऊट का घोषित केलं? (IND vs SL 3rd ODI)

Updated: Jan 16, 2023, 12:11 AM IST
...म्हणून श्रीलंकेच्या 9 विकेट्स असताना टीम इंडियाला विजयी घोषित केलं, जाणून घ्या!  title=

IND vs SL 3rd ODI : भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या तिसऱ्य टी-20 सामन्यामध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताच्या 391 धावांचा पाठलाग करणारा श्रीलंका संघाचा डाव 73 धावांवर आटोपला. 317 धावांनी हा सामना जिंकत रोहित अँड कंपनीने मालिका 3-0 ने खिशात घातली. मात्र अनेक क्रिकेट चाहत्यांना असा प्रश्न पडला की श्रीलंका संघाच्या 9 विकेट्स गेल्या होत्या तरीही श्रीलंका संघाला ऑलआऊट का घोषित केलं? (IND vs SL 3rd ODI why Team India is declared the winner with 9 wickets of Sri Lanka latest Marathi Sport News)

नेमकं काय झालं? 
श्रीलंका संघाला दिलेल्या डोंगराएवढा लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने भारतीय वेगवान माऱ्यासमोर सपशेल नांगी टाकली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने श्रीलंका संघाला मोठं खिंडार पाडलं. त्याने सुरूवातीच्या प्रमुख फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. सिराजने 4 विकेट्स घेतल्या तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सिराजने प्रसंगावधान राखत आपल्याच गोलंदाजीवर चतुराईने चमिका गुणरत्नेला माघारी पाठवलं.  

श्रीलंकेच्या तळाचे फलंदाज लाहिरु कुमारा आणि कसून राजिथा यांनी चिवट फलंदाजी केली. सिराजने ही जोडी फोडण्यासाठी यॉर्कर, बाऊन्सर आपली सर्व शस्त्र वापरलीत. तरीही दोघांनी काही मैदान सोडलं नव्हतं, सिराजचा 10 ओव्हरचा कोठा पूर्ण झाल्यावर रोहितने श्रेयस अय्यरनेही ओव्हर टाकली मात्र त्यालाही काही यश आलं नाही.

चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने लाहिरूला बोल्ड करत ही जोडी फोडली. संघाच्या 9 विकेट्स पडल्या होत्या आणि श्रीलंकेचा दहावा फलंदाज बॅटींगसाठी येणार तर दुसरीकडे भारत एतिहासिक विजयापासून दूर होता. काही वेळातच भारताला विजयी घोषित करण्यात आलं. याचं कारण असं की, श्रीलंकेचा शेवटचा फलंदाज अशेन बंदारा फिल्डिंग करताना दुखापती झाला होता. तो खेळायला न आल्यामुळे 9 वी विकेट पडल्यावर भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आलं.

दरम्यान, भारतीय संघाने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. तब्बल 317 धावांनी हा विजय मिळवला असून याआधी न्यूझीलंज संघाच्या नावावर हा रेकॉर्ड होता. 2008 साली न्यूझीलंडने 290 धावांनी आर्यलँडवर सर्वात मोठा विजय मिळवला होता.