Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला कधी आहे, कुठे आणि किती दिवे लावायचे? दीपदानालाही आहे अतिशय महत्त्व

Dev Diwali 2024 : देव दिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येतात. यादिवशी दीपदानाला अतिशय महत्त्व आहे. कधी आहे देव दिवाळी, कुठे आणि किती दिवे लावायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

नेहा चौधरी | Updated: Nov 15, 2024, 04:52 PM IST
Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला कधी आहे, कुठे आणि किती दिवे लावायचे? दीपदानालाही आहे अतिशय महत्त्व title=
Dev Deepawali When is dev diwali where and how many lights to Diva deepdan on kartik purnima 2024

Deepdan on Kartik Purnima 2024 : देव दिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येते. असं म्हणतात की यादिवशी देव पृथ्वीतलावर येतात. देव दिवाळीच्या दिवशी दिवे दान करण्याची परंपरा आहे. यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्यामुळे दिवे कधी आणि कुठे दान करावे आणि किती दिवे दान करावेत हेही जाणून घेणे गरजेचे आहे.

यंदा कधी आहे देव दिवाळी?

हिंदू पचांगानुसार कार्तिक पौर्णिमा तिथी ही, शुक्रवारी 15 नोव्हेंबरला सकाळी 6.19 मिनिटांपासून 16 नोव्हेंबर मध्यरात्री 2.57 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा असून यादिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते. 

दिवे कोठे दान करायचे?

1. मंदिरात दिवे दान करा.
2. विद्वान ब्राह्मणाच्या घरी दिवे दान करतात.
3. नदीच्या काठावर किंवा नदीत दिवे दान करा.
4. दुर्गम ठिकाणी किंवा जमिनीवर (शेतात) दिवे दान करा.

 

हेसुद्धा वाचा - Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस, 'या' 5 जागा दिवा नक्की लावा

 

कधी करावे दीपदान?

1. दीपदान प्रदोषकाळात किंवा नंतर देखील दान करु शकतात. प्रदोष काल देव दिवाळीचा मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:10 ते 7:47 या कालावधीत आहे.
2. सर्व स्नान पर्व आणि व्रताच्या वेळी दीपदान करतात.
3. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, यम द्वितीया, दीवाळी, अमावस्या किंवा पौर्णिमेला दीपदान केले जाते.
4. दुर्गम स्थळी किंवा भूमीवर दीपदान केल्याने व्यक्ती नरकात जाण्यापासून वाचतो.
5. पद्मपुराणाच्या उत्तरखंडात स्वयं महादेव कार्तिकेयला दिवाळी, कार्तिक कृष्णपक्षाच्या पाच दिवसात दीपदान करण्याचे विशेष महत्व असल्याचे सांगितले गेले आहे.

किती दिवे दान करावे?

देव दिवाळीला नदीच्या काठावर 11, 21, 51 किंवा 108 दिवे लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यापेक्षा जास्त दिवे लावू शकता.

दिवे दान करण्याचे फायदे 

1. अकाली मृत्यू टाळण्यासाठी दिवे दान करा.
2. आपल्या मृत नातेवाईकांसाठी अर्थात पितरांच्या उद्धारासाठी दिवे दान करा.
3. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी दिवे दान करतात.
5. यम, शनि, राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी दिवे दान करा.
6. सर्व प्रकारचे त्रास, वाद आणि संकटे टाळण्यासाठी दिवे दान करा.
7. जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आणि प्रकाश आणण्यासाठी आपण दिवे दान करतो.
8. मोक्षप्राप्तीसाठी दिवे दान करा.
9. कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी दिवे दान करा.
10. घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी, याला दीपदान देखील म्हणतात.
11. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ मिळते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)