Yuvraj Singh All Time Best Playing 11 : जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर्समध्ये भारताच्या अनेक स्टार क्रिकेटर्सची नाव येतात. भारताचा स्टार क्रिकेटर युवराज सिंहने ऑल टाईम बेस्ट प्लेईंग 11 निवडली. मात्र यात युवराजने भारताचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट विकटकीपर पैकी एक असलेल्या एम एस धोनीला स्थान दिलं नाही. त्यामुळे धोनीचे फॅन्स युवराज सिंहवर नाराज झाले आहेत.
युवराज सिंहने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला बेस्ट प्लेईंग 11 निवडण्यास सांगण्यात आले. होस्टने युवीला सांगितले की, यात दिग्गज क्रिकेटर्स सह युवा स्टार क्रिकेटर्सचाही समावेश करू शकता. युवराज सिंहने बेस्ट प्लेईंग 11 मध्ये सर्वाधिक 4 ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना निवडले. युवीने प्लेईंग 11 ची नावं सांगताना 7 नाव पटापट सांगून टाकली तर यापुढची नावं निवडणे थोडं अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.
युवराजने त्याच्या ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 ची सुरुवात सचिन तेंडुलकर पासून केली. मग त्याने रिकी पॉन्टिंग, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिविलियर्स, एडम गिलक्रिस्ट, शेन वॉर्न यांची नावं घेतली. तर यानंतर मुथैया मुरलीधरन, वसीम अकरम, ग्लेन मॅक्ग्रा आणि एंड्रयू फ्लिंटॉफ अशी नावं घेतली.
हेही वाचा : IND VS BAN : भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच; कधी, कुठे पाहता येणार फ्री?
बेस्ट प्लेईंग 11 सांगितल्यावर होस्ट 12 व्या खेळाडूचं नावही विचारते यावर युवराज हसून स्वतःच नाव घेतो. तो म्हणतो, "मीच 12 वा खेळाडू आहे". युवराज सिंहने या ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 मध्ये एम एस धोनीला स्थान दिलं नाही, यावरून आता धोनीचे फॅन्स नाराज झाले असून ते प्रश्न उपस्थित करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'सातव्या क्रमांकावर थाला असायला हवा होता', तर एकाने लिहिले 'युवराजच्या मनात धोनी विषयी असलेली गाठ अजून उघडली नाही'.
"मी धोनीला माफ करणार नाही. त्याने आरशात आपला चेहरा पाहावा, तो मोठा क्रिकेटर आहे. पण त्याने माझ्या मुलाविरोधात जे काही केलं ते सगळं आता बाहेर येऊ लागलं आहे. मी त्याला आयुष्यात कधीच माफ करु शकणार नाही. एकतर जो माझ्यासोबच चुकीचं करतो त्याला मी कधीच माफ करत नाही, दुसरं म्हणजे मी आयुष्यात कधीच त्यांना मिठी मारत नाही. मग ती माझी मुलं असो किंवा कुटुंबातील सदस्य असोत," असं योगराज सिंग यांनी झी स्विच युट्यूब चॅनेलशी बोलताना सांगितलं.