WTC Final Scenario: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) भारताविरुद्ध दुसरा टेस्ट सामना 10 विकेट्सने जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ WTC पॉईंट्स टेबलमध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचला होता. तर भारतीय संघ प्रथम स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी घसरला होता. मात्र ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थान मिळून 24 तास उलटत नाहीत तोवर पुन्हा एकदा WTC पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील सलग दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आणि 2-0 ने आघाडी घेत सिरीज खिशात घातली. यावेळी आफ्रिकेने श्रीलंकेवर 109 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला असून दक्षिण आफ्रिका आता प्रथम स्थानी पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेला ही सीरिज जिंकल्यामुळे जवळपास 4 पॉईंट्स चा फायदा झाला आहे. यापूर्वी आफ्रिकेचा संघ हा 59.26 पॉईंट्सने दुसऱ्या स्थानावर होता. तर आता श्रीलंके विरुद्ध विजयानंतर 63.33 पॉईंट्सवर पोहोचली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांना पॉईंट्स टेबलमध्ये फटका बसला आहे. तर टीम इंडिया मात्र तिसऱ्या क्रमांकावरच आहे. रविवारी एडिलेड टेस्टमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यावर पहिल्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर आली होती. दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे श्रीलंकेला पॉईंट्स टेबलमध्ये फक्त अंकांचं नुकसान झालं आहे, तर चौथ्या क्रमांकावरून त्यांची पोझिशन हललेली नाही. पूर्वी श्रीलंकेचे 50.00 टक्के पॉइंट होते तर आता त्यात घट होऊन ते 45.45 टक्के झाली आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून त्यांची टक्केवारी ही 60.71 इतकी आहे.
हेही वाचा : मोहम्मद सिराज आणि हेडवर होणार मोठी कारवाई? एडिलेड टेस्टनंतर आयसीसी अॅक्शन मोडमध्ये
श्रीलंकेला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर यासाठी त्यांच्या आशा आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या शेवटच्या टेस्ट सीरिजवर टिकून राहिली आहे. श्रीलंकेला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 सामन्यांची मालिका खेळायची आहे. श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे 53.85 गुण होतील. पण इतक्या गुणांसह ते WTC फायनलच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतो की नाही, हे भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजच्या निकालावर अवलंबून असेल.
पहिली टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी टेस्ट: 6 ते 10 डिसेंबर
तिसरी टेस्ट: 14 ते 18 डिसेंबर
चौथी टेस्ट: 26 ते 30 डिसेंबर
पाचवी टेस्ट: 3 ते 7 जानेवारी