मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना टीम इंडियाच्या हातून गेला. टीम इंडियाने केलेल्या छोट्या चुकांचा फायदा किवीने उचलला आणि त्यांनी चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीला खूप ट्रोल करण्यात आलं. जसप्रीत बुमराहला तर लग्नाआधीचा बुमराह हवा असंही सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. टीम इंडियाच्या पराभवानंतर बुमराहला पत्नी संजना गणेशननं खास गिफ्ट दिलं आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी बुमराह चांगली कामगिरी करेल अशी आता सर्वांची आशा आहे. जसप्रीत बुमराहचा मूड बदलण्यासाठी संजनाने त्याला खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टमुळे संजना आणि बुमराह पुन्हा एकदा चर्चात आले आहेत.
संजनाने बुमराहसाठी खास आपल्या हाताने जेवण बनवलं आणि त्याला वाढलंही. संजनाने जेवणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बुमराहसाठी तिने खास गार्लिक ब्रेड आणि पास्ता बनवला आहे. प्रेमानं केलंय असं कॅप्शन देऊन संजनाने सोशल मीडियावर फोटो शेअर केला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिमध्ये बुमराहने 26 ओव्हर्समध्ये 9 मेंडन फेकले आणि 57 धावा किवीला दिल्या. पण बुमराहला एकही विकेट मिळवता आली नाही. नेहमी विकेट घेणारा बुमराह यावेळी मात्र विकेट काढू न शकल्यानं सर्वांचाच भ्रमनिरास झाला. टीम इंडियाचा किवीने 8 विकेट्सने पराभव केला.
न्यूझीलंड विरुद्धचा सामना वगळता सर्व सामने टीम इंडियाने खूप चांगल्या पद्धतीनं खेळले. 10 सामन्यात बुमराहने 34 विकेट्स आपल्या नावावर केले. दोन वेळा 5 विकेट घेऊन त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरीही बजावली होती.
संजना आणि बुमराहने मार्च महिन्यात गोव्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह केला. आता संजनाने बुमराहच्या चॅम्पियनशिपनंतरचा मूड बदलण्यासाठी त्याला खास गिफ्ट दिलं. 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया 14 जुलैला एकत्र जमून पुढे नॉटिंघमला जाणार आहेत.