चेन्नईच्या स्टार खेळाडूवर लवकरच बायोपिक? कास्टिंगसाठी दाक्षिणात्य अभिनेत्याला प्राधान्य

'बायोपिक होणार असेल तर दाक्षिणात्य अभिनेत्यानं माझी भूमिका करावी'

Updated: Jun 27, 2021, 07:06 AM IST
चेन्नईच्या स्टार खेळाडूवर लवकरच बायोपिक? कास्टिंगसाठी दाक्षिणात्य अभिनेत्याला प्राधान्य title=

मुंबई: चेन्नई सुपकिंग्स संघातील स्टार खेळाडू आणि कॅप्टन कूलचा खास मित्र म्हणून ओळख असलेल्या फलंदाजावर लवकरच बायोपिक येणार असल्याची चर्चा आहे. चेन्नईचा दमदार फलंदाज सुरेश रैनानं धोनीपाठोपाठ 2020मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरुपात धोनी आपल्या चाहत्यांना सुखद धक्के देत आहे. 

सुरेश रैनानं नुकतंच आपलं आत्मचरित्र प्रकाशित केलं. त्या पुस्ताकाचं नाव आहे Believe: What Life and Cricket Taught Me या पुस्तकातून रैनानं क्रिकेट आणि आपल्या आयुष्यातील आलेल्या अनुभवातून काय शिकायला मिळालं हे मांडलं असल्याचं सांगितलं आहे. 

लाइव्ह सेशन दरम्यान सुरेश रैनाने त्याच्या पुस्तकाची बरीच जाहिरात केली. त्याचबरोबर त्याने सांगितले की आपली इच्छा आहे की त्याचा बायोपिक तयार केला तर दक्षिणेच्या 2 सुपरस्टार्समध्ये कोणीतरी आपली भूमिका साकारली पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. रैनाने दाक्षिणात्या अभिनेत्यांना प्राधान्य दिलं पण कोणत्याही बॉलिवूड सुपरस्टारचे नाव घेत नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटलं.

सुरेश रैना म्हणाला, 'मला दक्षिणेकडील कोणीतरी हवे आहे, जो माझी भूमिका करू शकेल. कारण माझ्यासाठी चेन्नई आणि सीएसके संघ किती महत्त्वाचा आहे हे दाक्षिणात्य अभिनेत्यालाच समजू शकतं. सूर्याने ही भूमिका करावी अशी माझी इच्छा आहे. मला माहीत आहे की ते हे करू शकतात. दुलकर सलमानचा अभिनयही उत्कृष्ट आहे.