मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला दिवस पावसानं खेळ केला. टॉस होण्याआधीच पावसानं मैदानात हजेरी लावली आणि मैदाना धुतलं. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह खेळाडूंची काहीशी निराशा झाली. पहिल्या सत्रासाठी स्थगित करण्यात आलेला सामना पुढेही स्थगित करावा लागला त्यामुळे पहिला दिवस तर असाच गेला.
टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची टॉसआधीच घोषणा केली. याचा फायदा किवी टीमला त्यांची स्ट्रॅटजी बदलण्यासाठी होऊ शकतो. तर न्यूझीलंड टॉस होण्याची वाट पाहात आहे. पावसामुळे वेगवान गोलंदाजांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर स्पिनर्सना नुकसान होऊ शकतं. न्यूझीलंड टीम 4 वेगवान गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया देखील आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टॉसपूर्वी बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किवी टीमच्या स्ट्रॅटजी आणि हवामानाचा अंदाज घेऊन कोहली हा बदल करण्याची सूट देण्यासाठी मॅनजमेंटला विनंती करू शकतो. तर टीम न्यूझीलंड हवामान आणि पावसाचा फायदा घेऊन आपले चार गोलंदाज मैदानात उतरवू शकते.
किवी टीमचा कर्णधार केन विल्यमसन वॅगनर, ट्रेंट बोल्ट, काइल जेमिसन आणि टिम साउदी या चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात खेळण्यासाठी उतरण्याची शक्यता आहे. तर टीम इंडियाने जाहीर केलेल्या संघात 3 वेगवान गोलंदाज आहेत तर 2 स्पिनर्स असणार आहेत. टीम इंडियाला बदल करण्याची मूभा मिळाली नाही तर काहीसं नुकसान देखील होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
डेवॉन कॉनवे, टॉम लॅथम, केन विलियमसन, रॉस टेलर, हेनरी निकोल्स, कॉलिन डी ग्रॅन्डहोम, काइल जेमिसन, बीजे वॉटलिंग, नील वॅगनर, ट्रेंट बोल्ट, टिम साउदी
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.