मुंबई : प्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. आधी त्यांच्या पत्नीने म्हणजेच निर्मला कौरने साथ सोडली. कोरोनामुळे त्यांच्या पत्नीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता कोरोनावर मात करून स्थिरावणाऱ्या मिल्खा सिंग यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं.
मिल्खा सिंग यांची पत्नी देखील एक खेळाडू होती. हे अनेक जणांना माहीत ही नसेल कदाचित. दोन महान खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. मिल्खा सिंह आणि त्यांची पत्नी निर्मला कौर यांची लव्हस्टोरी वेगळी आहे. मिल्खा सिंह हे पहिल्या नजरेतच निर्मला यांच्या प्रेमात पडले होते.
मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजर ही खेळाच्या मैदानावरच भिडली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. मिल्खा सिंग यांचं अनेक मुलींसोबतच्या अफेअरच्या चर्चाही गाजल्या होत्या. एक दोन नव्हे तर तीन मुलींसोबत मिल्खा सिंह यांचं नाव जोडलं गेलं होतं. या मुलींसोबत प्रेमाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. मात्र मिल्खा यांचा जीव जडला तो मैदानावरच्या हॉलीबॉल खेळणाऱ्या राणीवर.
1955 मध्ये श्रीलंकेमध्ये मिल्खा सिंग आणि निर्मला कौर पहिली भेट झाली होती. याच ठिकाणी दोघांची एकमेकांशी ओळखही झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला असल्याचा किस्साही फार गाजला आहे.
पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. 1960 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत गेलं.
दरम्यान या दोघांच्याही लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरातून मात्र विरोध होता. मिल्खा सिंग शिख असल्याने निर्मला कौर यांचे वडील दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा येत होता. अशावेळी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.
1962 मध्ये मिल्खा आणि निर्मला या दोघांचं लग्न झालं. मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या पत्नीचे जाहीरपणे कौतुक केलं केलं होतं. ते आपल्या बायकोला स्वतःची सर्वात मोठी ताकद मानत असत. त्यांच्या या प्रिय व्यक्तीला मिल्खा सिंग यांनी कोरोनामुऴे गमवलं. तर मिल्खा सिंग यांचंही कोरोनातून बरे झाल्यानंतर निधन झाल्यानं क्रीडा विश्वात शोकाकूल वातावरण आहे.