WTC FINAL | आयसीसीच्या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडची कामगिरी कशी? पाहा आकडेवारी

टीम इंडिया आणि न्यूझीलंड  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. 

Updated: May 30, 2021, 02:44 PM IST
WTC FINAL | आयसीसीच्या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडची कामगिरी कशी? पाहा आकडेवारी title=

मुंबई : टीम इंडिया (Team india) आणि न्यूझीलंड (New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (world test championship final 2021) आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना 18-22 जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला  1 ऑगस्ट 2019 मध्ये एशेज सीरिजपासून सुरुवात झाली होती. टीम इंडिया आणि न्यूझीलंडने धमाकेदार कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक मारली. भारतीय संघाने 6 मालिकांमध्ये 520 पॉइंट्सची कमाई केली. तर न्यूझीलंडने 5 टेस्ट सीरिजमध्ये 420 पॉइंट्स मिळवले. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यानिमित्ताने या उभयसंघाची आयसीसीच्या स्पर्धेत आतापर्यंत कशी कामगिरी राहिली आहे, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (world test championship final 2021 team india vs new zealand head to head records in icc Tournaments)

काय सांगते आकडेवारी?

उभयसंघ आतापर्यंत आयसीसी स्पर्धेत एकूण 10 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये न्यूझीलंड टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. न्यूझीलंडने भारताचा 7 सामन्यात धुव्वा उडवला आहे. त्यामुळे ही आकडेवारी टीम इंडियाच्या दृष्टीने धोकादायक आहे. भारतीय संघ गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शानदार कामगिरी करत आहे. पण, भारतासमोर न्यूझीलंडचं तगडं आव्हान असणार आहे.  

पहिल्यांदा केव्हा भिडले? 

उभयसंघ आयसीसीच्या स्पर्धेत पहिल्यांदा 1975 मध्ये आमनेसामने आले. हा वर्ल्ड कपमधील सामना होता. या सामन्यात किवींनी भारतावर 4 विकेट्सने मात केली होती. यानंतर 1979 मध्ये दुसऱ्यांदा दोघांची टक्कर झाली. या मॅचमध्ये न्यूझीलंडने भारताचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. उभयसंघांचा 1987 मध्ये 2 वेळा आमनासामना झाला. यावेळेस भारताने न्यूझीलंडला 2 वेळा अस्मान दाखवलं. टीम इंडियाने पहिला सामना 16 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या मॅचमध्ये किवींचा 9 विकेट्सने पराभव केला. पाचवा सामना 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आला. यावेळेस किवींचा 4 विकेट्सने विजय झाला होता.       

सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव

सहाव्यांदा उभयसंघ 1999 आमनेसामने आले. यावेळेसही भारताला न्यूझीलंडकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. सातव्यांदा 2000 च्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांची गाठ पडली. हा बाद फेरीतील (Knock-Out) सामना होता. हा सामना न्यूझीलंडने 4 विकेट्सने आपल्या खिशात घातला. आठव्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला उपट दिली. 2003 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी केली. यावेळेस टीम इंडियाने न्यूझीलंडला 7 विकेट्सने पराभवाची धूळ चारली.  

दोन्ही टीम नवव्यांदा 2016 च्या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा समोर आले होते. यावेळेस भारताला 46 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही संघ अखेरीस 2019 मधील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भिडले होते. हा सेमी फायनल सामना होता. हा सामना फार रंगतदार झाला होता. थरारक सामन्यात भारताचा अवघ्या 18 धावांनी पराभव झाला होता.