असे 6 स्टार क्रिकेटर्स जे लग्नापूर्वी झाले बाबा, हार्दिक पांड्यासह लिस्टमध्ये मोठ्या दिग्गजांचं नाव

जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी लग्नापूर्वी बाप बनण्याचा आनंद मिळवला आहे.

Updated: May 5, 2022, 10:34 PM IST
असे 6 स्टार क्रिकेटर्स जे लग्नापूर्वी झाले बाबा, हार्दिक पांड्यासह लिस्टमध्ये मोठ्या दिग्गजांचं नाव title=

मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी लग्नापूर्वी बाप बनण्याचा आनंद मिळवला आहे. लग्नाआधी प्रेयसीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर हे क्रिकेटर्स बाबा झाले आहेत. क्रिकेटपटूंच्या या अनोख्या यादीत एका भारतीयाचाही समावेश आहे. चला एक नजर टाकूया अशाच 6 क्रिकेटर्सवर जे लग्नाआधीच बाबा झाले आहेत.

1. हार्दिक पंड्या

हार्दिक पांड्या हा असा भारतीय क्रिकेटर आहे, जो लग्नाआधीच बाबा झाला आहे. हार्दिक पांड्याने 1 जानेवारी 2020 रोजी दुबईमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडल नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले. 30 जुलै 2020 रोजी, हार्दिक पांड्याने उघड केले की, त्याची मैत्रीण गर्भवती आहे आणि तो वडील होणार आहे. हार्दिक पांड्याने आपल्या मुलाचे नाव 'अगस्त्य' ठेवले आहे.

2. जो रूट

या यादीत इंग्लंडचा कर्णधार जो रूटचाही समावेश आहे. जो रुट हा देखील लग्न न करता बाबा झाला आहे. जो रूट 2014 पासून त्याची गर्लफ्रेंड कॅरी कॉर्टेलला डेट करत होता. मार्च 2016 मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली, वर्ल्ड कप टी-20 आधी जो रूट लग्नाशिवाय बाबा झाला. जो रूटचा मुलगा अल्फ्रेडचा जन्म 7 जानेवारी 2017 रोजी झाला. यानंतर जो रूट आणि त्याच्या गर्लफ्रेंडनं लग्न केले.

3. डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर लग्न न करता बाबा झाला आहे. 2014 मध्ये डेव्हिड वॉर्नरची गर्लफ्रेंड कँडिसने तिच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. 2015 मध्ये डेव्हिड वॉर्नरने कँडिसशी लग्न केलं. वॉर्नरला आता आयव्ही, इंडी आणि इस्ला या तीन मुली आहेत.

4. इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खानही लग्न न करताच बाबा झाले आहेत. इम्रान खान हे सीता व्हाईट यांना डेट करत होते. सीता आणि इम्रान हे 1987-88 याकाळात एकमेकांना डेट करत होते. 1992 मध्ये सीता व्हाईट यांना बाळा झाले, परंतु सुरुवातीला इम्रान खान यांनी नाकारलं, नंतर डीएनए टेस्टमध्ये हे मूल त्यांचंच असल्याचं समोर आलं.

5. व्हिव्हियन रिचर्ड्स

1980 मध्ये भारतात आलेल्या रिचर्ड्स यांनी भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांना डेट केलं. दोघांचे अफेअर बराच काळ चालले आणि दोघे लिव्ह-इनमध्येही होते. 1989 मध्ये नीना यांनी एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव मसाबा आहे. व्हिव्हियन रिचर्ड्सने मेरीशी लग्न केले होते आणि त्याला दोन मुले आहेत.

6. ख्रिस गेल

या यादीत जगातील सर्वात स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचंही नाव आहे, जो लग्न न करताच बाबा बनला आहे. 2017 मध्ये आयपीएल सुरू असताना त्याची गर्लफ्रेंड नताशा बॅरिजने मुलीला जन्म दिला.