ICC ODI World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. दरम्यान यापूर्वीच टीमला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीमचा कर्णधाराला फुटबॉल खेळताना दुखापत झाली आहे. यामुळे वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यातून देखील बाहेर होण्याची शक्यता आहे.
वर्ल्डकपूर्वी सध्या वॉर्म सामने सुरु केले आहेत. या सामन्यांपूर्वीच बांगलादेशाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशाचा कर्णधार शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) फुटबॉल खेळत होता. दरम्यान यावेळी त्याला दुखापत झाल्याचं समोर आलंय. या दुखापतीमुळे आता तो वॉर्म अप सामना खेळणार नाहीये. याशिवाय तो टूर्नामेंटच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडणार आहे.
वर्ल्डकप 2023 सुरू होण्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट टीमला मोठा धक्का बसला आहे आहे. बांगलादेश क्रिकेट टीमचा कर्णधार शाकिब अल हसनला ( Shakib Al Hasan ) टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी दुखापत झालीये. त्यामुळे बांगलादेशाच्या टीमच्या चिंतेत वाढ झाली आहे.
बांगलादेश क्रिकेट टीम श्रीलंकेविरुद्ध त्यांचा पहिला सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात शाकिब अल हसनच्या ( Shakib Al Hasan ) जागी फिरकी मेहदी हसन मिराझकडे टीमच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात येणार आहे. जर शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडला, तर मेहिदी हसन मिराझ वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.
शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो (उपकर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन, मुशफिकर रहिम. महमूद, गोंगाट करणारा इस्लाम, तंजीम हसन साकीब.