रोहितची विकेट पाहून पत्नी ऋतिकाला बसला आश्चर्याचा धक्का! Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Rohit Sharma Clean Bowled: रोहित शर्माने घरच्या मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच बॉलवर फोर मारला. मात्र त्याच्या पुढच्याच बॉलवर असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 2, 2023, 02:30 PM IST
रोहितची विकेट पाहून पत्नी ऋतिकाला बसला आश्चर्याचा धक्का! Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क title=
रोहित दुसऱ्याच बॉलवर बोल्ड

Rohit Sharma Clean Bowled: भारत आणि श्रीलंकेदरम्यान मुंबईतील वानखेडे मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या 33 व्या सामन्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर क्लिन बोल्ड झाला. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघातील सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले. होम ग्राऊण्ड असल्याने रोहित शर्मा दमदार कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. रोहितने दिलशान मधुशंकाच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूला चौकार लगावला आणि वानखेडेच्या मैदानात एकच जल्लोष झाला. रोहित आता मोठी खेळी करणार असं वाटत असतानाच सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर रोहित क्लिन बोल्ड झाला. रोहित अशापद्धतीने अनपेक्षितरित्या बोल्ड झाल्याने त्याची पत्नी ऋतिकालाही मोठा धक्का बसला. रोहित बोल्ड झाल्यानंतर ऋतिकाच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच थक्क करणारे होते.

रोहितच्या नावावर विक्रम

रोहित शर्मा केवळ 2 चेंडूसाठी मैदानात होता तरी त्याने चौकार लगावत वर्ल्ड कप 2023 मध्ये वैयक्तिक स्तरावर 400 धावांचा टप्पा गाठला. विराट हा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या टॉप 5 यादीमध्ये आहे. मात्र 400 धावांचा टप्पा ओलांडणारा वर्ल्ड कप 2023 मधील तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने वानखेडेमध्ये खेळण्यासाठी आपण कायमच उत्सुक असतो असं म्हटलं होतं. मात्र दुर्देवाने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात एकच शांतता पसरली. घरचं मैदान असलेल्या वानखेडेवर रोहित सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याने वानखेडेवरील मागील 4 सामन्यांमध्ये केवळ 50 धावा केल्या आहेत. आजही रोहित असा अनेपक्षितपणे बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्यात.

1)

2)

3)

भारत सेमीफायनलसाठी ठरेल पात्र

भारतीय संघ 2011 च्या वर्ल्ड कप फायनलनंतर पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटच्या सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध वानखेडेच्या मैदानामध्ये सामना खेळत आहे. भारतीय संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यास भारतीय संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे.