Sam Curran Angry On Cameraman : वर्ल्डकपमध्ये (ICC Cricket World Cup 2023) इंग्लंडची लढत तुलनेत दुबळ्या असलेल्या अफगाणिस्तानविरोधात (England vs Afghanistan) होतीये. मात्र, याच अफगाणिस्तानने इंग्लंडच्या नाकात दम केलाय. अफगाणिस्तानने पहिल्या पंधरा शतकांमध्येच नाबाद नावात 111 धावा करत इंग्लंडला धुतलं होतं. त्यामुळे इंग्लंडचे गोलंदाज चांगलेच तापल्याचं दिसून आलं. अशातच आता इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करन (Sam Curran) याचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सॅम करनने कॅमरामॅनला धक्काबुक्की केल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे क्रिडाविश्वात वाद चांगलाच पेटलाय. नेमकी चूक कोणाची? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसत आहे.
झालं असं की... प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. त्यावेळी रहमानउल्ला गुरबाज याने 80 धावांची स्फोटक खेळी केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ सुरूवातीलाच प्रेशरमध्ये आला. क्रिस वोक्स असो वा मार्क वूड गुरबाजने कोणालाच सोडलं नाही. सॅम करनला तर गुरबाजने एकाच ओव्हरमध्ये 20 धावा चोपल्या. अफगाणिस्तानच्या डावाच्या 9 व्या ओव्हरमध्ये रहमानुल्ला गुरबाजने सॅम करनला 2 फोर अन् 1 खणखीत सिक्स ठोकला. त्यामुळे सॅम करनचा पारा चांगलाच चढला होता. 10 व्या ओव्हरवेळी तो बॉन्ड्रीलाईनवर फिल्डिंगला गेला.
सॅम करन संतापाने लालबुंद झाला होता. त्यात भारताची गर्मी त्याला सोसवेना. सॅम करन फिल्डिंग करत असताना त्याच्या बाजूला कॅमेरामॅन शुट करत होता. त्यावेळी कॅमेरामॅन सॅमच्या जळव उभा होता. त्यावेळी सॅम कॅमेराला धक्काबुक्की करताना दिसला. लांब हो... इथं बॉन्ड्री आहे, असं म्हणत त्याने कॅमेरामॅनला सुनावलं. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Sam Curran in angry Mood after beating 20 runs in an over #ENGvsAFG | #CWC23 | #ENGvAFG pic.twitter.com/7MqOmhPyXY
— Cricket Universe (@Crickinnmyvien) October 15, 2023
दरम्यान, अफगाणिस्तान संघाने 12.4 षटकात आपले शतक पूर्ण केलं. गुरबाज 80 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत अफगाणिस्तानला नियमित धक्के दिले. बिनबाद 114 अशी स्थिती असताना अफगाणिस्तानची तीन बाद 122 अशी पडझड झाली होती. अखेर, युवा इक्रम अली खिल याने झुंजार अर्धशतक ठोकत अफगाणिस्तानला 284 पर्यंत मजल मारून दिली.