Virat Kohli Birthday : मोहम्मद रिझवानने मागितली खास दुआ, म्हणतो 'मला विराटवर विश्वास, तो वाढदिवसाला...'

Mohamamd Rizwan On Virat Kohli : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त मोहम्मद रिझवानने त्याला खास शुभेच्छा दिल्या. रिझवानने विराटसाठी दुआ देखील केलीये. काय म्हणतो पाकिस्तानी क्रिकेटर पाहा...

सौरभ तळेकर | Updated: Nov 2, 2023, 03:32 PM IST
Virat Kohli Birthday : मोहम्मद रिझवानने मागितली खास दुआ, म्हणतो 'मला विराटवर विश्वास, तो वाढदिवसाला...' title=
Mohammad Rizwan

Virat Kohli Birthday : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार प्लेयर विराट कोहली (Virat Kohli) आता ऐतिहासिक कामगिरीपासून फक्त 2 पाऊल लांब आहे. विराट कोहलीने आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 48 शतक ठोकले आहेत. त्यामुळे आता त्याला शतकांचं अर्धशतक करण्यासाठी 2 शतकांची गरज आहे. या दोन शतकांबरोबर विराट कोहली, क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) देखील रेकॉर्ड मोडेल. विराट कोहली येत्या 5 नोव्हेंबरला आपला 35 वा वाढदिवस साजरा करतोय. त्यामुळे किंग कोहली वाढदिवसाला चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये. अशातच आता पाकिस्तानचा स्टार प्लेयर मोहम्मद रिझवान (Mohamamd Rizwan) याने किंग कोहला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाला Mohamamd Rizwan ?

विराट कोहलीचा बर्थडे 5 नोव्हेंबरला आहे हे ऐकून मला आनंद झाला. मी त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जरी मी उत्सव साजरा करत नाही आणि माझा त्यावर विश्वास नाही, तरी देखील मला विश्वास आहे की, विराट त्याच्या वाढदिवसादिवशी 49 वं शतक ठोकेल. तसेच तो यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 50 शतक पूर्ण करेल, अशी आशा देखील मोहम्मद रिझवानने (Mohamamd Rizwan On Virat Kohli ) व्यक्त केली आहे.

किंग कोहलीच्या वाढदिवसाला खतरनाक तयारी

विराट कोहलीचा वाढदिवस खास बनवण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने विशेष तयारी केली आहे. कोहलीच्या बर्थडेला स्टेडियममध्ये अंदाजे 70 हजार चाहते विराट कोहलीच्या मास्कमध्ये दिसतील. याशिवाय खास केक कापला जाणार आहे. त्याचबरोबर ईडन गार्डन्समध्ये लेझर शोचं आयोजन करण्यात येणार आहे.  त्यासाठी CAB च्या अध्यक्षा स्नेहाशिस गांगुली यांनी आयसीसीकडे खास परवानगी देखील मागितली आहे.

आणखी वाचा - वर्ल्ड कप तर गेला, चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड पात्र ठरणार का? पाहा कसं असेल समीकरण

दरम्यान, येत्या 5 नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डनवर भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात वर्ल्ड कपमधील सामना खेळवला जाणार आहे. टेबल टॉपरमधील दोन संघात हा सामना असल्याने सामना घासून होणार यात काही शंकाच नाही. सामन्याचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.