मुंबई : २०१९ सालचा ५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपची पहिली मॅच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, विंडीज आणि दक्षिण आफ्रिका या १० टीम सहभागी होणार आहेत.
हा राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे, त्यामुळे प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध एक मॅच खेळणार आहे. म्हणजेच पहिल्या फेरीत प्रत्येक टीम ९ मॅच खेळणार आहे. या ९ मॅचनंतर टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. सेमी फायनलमध्ये विजय झालेल्या टीममध्ये फायनल रंगेल. १४ जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर २०१९ वर्ल्ड कपची फायनल रंगेल. ९ जुलै आणि ११ जुलैला दोन सेमी फायनल होणार आहेत.
३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार असली तरी भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधल्या सगळ्या मॅच या भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होतील. स्टार स्पोर्ट्सकडे वर्ल्ड कप मॅचच्या प्रसारणाचे अधिकृत अधिकार आहेत. तर मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर बघता येईल.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर
५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
९ जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड
१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान
२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड
२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश
६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका