World Cup 2019 : टीम इंडियाच्या कामगिरीवर सचिन निराश

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.

Updated: Jul 10, 2019, 11:54 PM IST
World Cup 2019 : टीम इंडियाच्या कामगिरीवर सचिन निराश title=

मॅनचेस्टर : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. न्यूझीलंडने ठेवलेल्या २४० रनचा पाठलाग करताना टीम इंडिया ४९.३ ओव्हरमध्ये २२१ रनवर ऑल आऊट झाली. यामुळे टीम इंडियाचा १८ रननी पराभव झाला. यानंतर सचिन तेंडुलकरने भारताच्या बॅटिंगवर नाराजी व्यक्त केली आहे. २४० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना आपण राईचा पर्वत केला. भारतीय बॅट्समनना हे आव्हान पूर्ण करता यायला पाहिजे होतं, असं सचिन म्हणाला.

'भारताला पहिले ३ धक्के देऊन न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली. पण तुम्ही प्रत्येकवेळी रोहित आणि विराटवर अवलंबून राहू शकत नाही. त्यांच्यासोबत असणाऱ्या खेळाडूंनीही जास्त जबाबदारी घ्यायला पाहिजे. तसंच प्रत्येकवेळी धोनी येईल आणि सामना जिंकवून देईल, अशी अपेक्षा ठेवणंही चुकीचं आहे. धोनीने अशी कामगिरी अनेकवेळा केली आहे,' अशी प्रतिक्रिया सचिनने दिली. तसंच सचिनने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं आहे.