World Cup 2019 : सौरव गांगुली म्हणतो; 'टीम इंडियाला ही चूक महागात पडली'

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.

Updated: Jul 10, 2019, 11:38 PM IST
World Cup 2019 : सौरव गांगुली म्हणतो; 'टीम इंडियाला ही चूक महागात पडली' title=

मॅनचेस्टर : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. न्यूझीलंडने ठेवलेल्या २४० रनचा पाठलाग करताना टीम इंडिया ४९.३ ओव्हरमध्ये २२१ रनवर ऑल आऊट झाली. यामुळे टीम इंडियाचा १८ रननी पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडियाच्या काही निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

'ऋषभ पंत बॅटिंग करत असताना धोनीला बॅटिंगला पाठवायला पाहिजे होतं. त्यावेळी धोनी मैदानात असता तर त्याने पंतला हवेच्याविरुद्ध दिशेने शॉट मारायला दिला नसता. इंग्लंडमध्ये ही गोष्ट महत्त्वाची असते. त्यावेळी धोनी मैदानात असता तर त्याने पंतला फास्ट बॉलरवर आक्रमक खेळ करायला सांगितला असता, कारण मिड ऑन आणि मिड ऑफ वरती होते,' असं वक्तव्य गांगुलीने केलं.

'धोनीने वरच्या क्रमांकावर बॅटिंग करायला पाहिजे होती. कारण धोनीने त्यावेळी विकेट पडून दिल्या नसत्या. जडेजा बॅटिंग करत असताना धोनी तिकडे होता. धोनीला तुम्ही सातव्या क्रमांकावर खेळवू शकत नाही,' असं सौरव गांगुली म्हणाला.

'मागच्या दीड वर्षामध्ये निवड समितीने मधल्या फळीत बरेच बदल करून मोठी चूक केली. यामुळे भारताला मजबूत मधली फळी मिळाली नाही,' अशी टीका गांगुलीने केली.