भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर आपल्या एका विधानामुळे टीकेचा धनी झाला आहे. महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला सामना पार पडला. या सामन्यात संजय मांजरेकरांनी समालोचन करताना केलेल्या विधानामुळे त्याच्यावर वर्षद्वेषी असल्याची टीका होत आहे. उत्तर भारतातील खेळाडूंची आपल्याला सखोल माहिती नाही असं संजय मांजरेकरने म्हटलं आहे.
मांजरेकर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कोचिंग युनिटबद्दल बोलत असताना हे घडलं. त्याचा सहकारी समालोचक पंजाबचा माजी खेळाडू आणि संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बाली यांच्याबद्दल बोलत होता. तेव्हा मांजरेकरने आपण त्यांना ओळखण्यात अपयशी ठरल्याचं मान्य केलं.
संजय मांजरेकर म्हणाला की, "माफ करा, मी त्याला ओळखलं नाही. उत्तरेच्या खेळाडूंकडे माझं जास्त लक्ष नसतं". संजय मांजरेकचं हे विधान नेटकऱ्यांना फारच आवडलं नाही. यानंतर सोशळ मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली.
I've no interest in North Indian Cricketers
- Sanjay Manjrekar
Why so much hate ? pic.twitter.com/RBPkPvYuCJ— Sports_comedy (@sports_komedy) October 5, 2024
भारतीय महिला क्रिकेट संघाला (Indian Women Cricket Team) टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही. दुबईत झालेल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 58 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 160 धावा केल्या होत्या. कर्णधार सोफीने नाबाद 57 धावा ठोकल्या. पण भारतीय संघ फक्त 102 धावांवर ऑल आऊट झाला. रोजमेरीने 4 विकेट्स घेतल्या.
I don't have interest in North Indian cricketers
~Sanjay Manjrekar @ICC @BCCI how can you allow such racist person in comm panel
Put ban on him
— Naeem (@18ModernMaster) October 5, 2024
PATHETIC. SHOULD BE SACKED IMMEDIATELY https://t.co/YUakKqahm3
— तपिश सिंह (@sinhatapish) October 5, 2024
Sanjay Manjrekar said, “I don’t pay much attention to players from the North.”
Mumbai Lobby is a real thing!!
— abhay singh (@abhaysingh_13) October 5, 2024
14 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर एक वाद झाला. न्यूझीलंडच्या केरने लाँग ऑफला चेंडू टोलावला आणि एक धाव काढली. हरमनप्रीत कौरने चेंडू अडवला होता. एकीकडे ओव्हर संपलेली असल्याने हरमनप्रीतला चेंडू डेड आहे असं वाटलं, तर दुसरीकडे केरने दुसऱ्या रनसाठी धाव घेतली. पण तो पूर्ण करण्याआधी ती रन आऊट झाली. पण तोपर्यंत अम्पायर्सनी टोपी दिप्ती शर्माकडे दिली होती आणि ओव्हर पूर्ण झाल्याचं जाहीर केलं होतं.
भारतीय संघाने रन-आऊटसाठी अपील केली होती आणि दुसरीकडे केरनेही डग-आऊटच्या दिशने चालण्यास सुरुवात केली होती. पण अम्पायर्सनी ओव्हर संपली असल्याने ही धाव अयोग्य होती असं सांगत तिला नाबाद जाहीर केलं.