पक्ष फुटू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आखली रणनिती! यापुढे आमदारांना...

शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यावेळी अलर्ट झाले असून नवनिर्वाचित आमदारांना आता शपथबंधनात बांधण्यात आलंय  

शिवराज यादव | Updated: Nov 25, 2024, 08:27 PM IST
पक्ष फुटू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आखली रणनिती! यापुढे आमदारांना... title=

विधानसभा निवडणुकीच्य निकालानंतर मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे गटनेते, प्रतोद या संदर्भात निर्णय झाला. त्यासोबतच आमदारांबाबत उद्धव ठाकरेंनी एका वेगळ्या रणनितीचा अवलंब केलाय. पाहूयात. 

शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यावेळी अलर्ट झाले असून नवनिर्वाचित आमदारांना आता शपथबंधनात बांधण्यात आलंय. अडीच वर्षापूर्वी झालेल्या शिवसेनेतील फुटीतून मोठा धडा घेत ठाकरेंनी ही खबरदारी घेतलीय. मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलंय.

अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र  सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेण्यात आलंय. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केलाय. त्यासोबतच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे आमदार महिनाभरात फुटतील असंही सामंत यांनी म्हटलंय. 

शिवसेनेचे नेते आमदार फुटीचा दावा करत असले तरीही शिवसेना यूबीटीचे विधानसभेतील नवनिर्वाचित गटनेते भास्कर जाधव यांनी हा दावा फेटाळलाय. आमचा आमच्या आमदारांवर विश्वास असल्याचं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय.

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी 95 जागा लढवून त्यांना फक्त 20 जागा मिळाल्या शिवसेनेचा मागील पक्ष फुटीचा अनुभव पाहता,उद्धव ठाकरे यांनी कोणतीही जोखिम न घेण्याचं ठरवल्यानंच आमदारांना शपथबंधनात बांधण्यात आल्याची चर्चा आहे.