IPL 2023 Final : फायनलमध्ये पतीला साथ देण्यासाठी 'या' खेळाडूच्या पत्नीने सोडली नोकरी, VIDEO VIRAL

IPL 2023 Final : आयपीएल 2023 चं जेतेपदसाठीचा थरार पाहण्यासाठी जेवढे चाहते उत्सुक आहे. तेवढेच खेळाडूंचे कुटुंबही आहे. फायनलमध्ये पतीला साथ देण्यासाठी एका खेळाडूच्या पत्नीने चक्क नोकरी सोडली आहे. 

Updated: May 29, 2023, 12:37 PM IST
IPL 2023 Final : फायनलमध्ये पतीला साथ देण्यासाठी 'या' खेळाडूच्या पत्नीने सोडली नोकरी, VIDEO VIRAL  title=
Wife Kim Conway quits her job to support Devon Conway in the IPL 2023 Final narendra modi stadium video viral trending now

IPL 2023 Final : Chennai Super King आणि Gujarat Titans यांमधील आयपीएल 2023 चॅम्पियनशीपचा थरार पावसामुळे रविवारी रद्द झाला. त्यामुळे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजारोच्या संख्ये उपस्थित चाहत्यांची निराशा झाली. आता हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचं हे 16 वं वर्ष असून यांचा विजेतापद कोणाला मिळणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अशात सोशल मीडियावर एक खेळाडूच्या पत्नीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

'या' खेळाडूच्या पत्नीने नोकरी सोडली

फायनल मॅचचा थरार पाहण्यासाठी जेवढं चाहते उत्सुक आहेत तेवढीच उत्सुकता Chennai Super King आणि Gujarat Titans या खेळांडूंच्या कुटुंबियांमध्येही आहे. अशातच एका खेळाडूच्या पत्नीने फायनल पाहण्यासाठी नोकरी सोडली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर डेव्हन कॉनवेच्या पत्नी नोकरी सोडल्याचा निर्णय घेतला असून तिने याबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. न्यूझीलंडस्थित डेव्हॉन कॉनवेची पत्नी किम कॉनवेने फायनलमध्ये पतीला साथ देण्यासाठी नोकरी सोडून  12,000 किमीचा प्रवास थेट भारत गाठले आहे.  (Wife Kim Conway quits her job to support Devon Conway in the IPL 2023 Final narendra modi stadium video viral trending now )

या व्हिडिओमध्ये डेव्हॉन कॉनवेची पत्नी किम कॉनवे म्हणते की, ती एका IT कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होती.पण भारतात सुरु असलेल्या आयपीएलच्या थरारत तिला डेव्हॉनला साथ देण्यासाठी महत्त्वपूर्ण घ्यावा लागला. तिने या नोकरीचा राजीनामा देऊन भारतात थांबण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील chennaiipl या अकाऊटंवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. 

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ 10व्यांदा फायनलमध्ये दाखल झाला आहे. माहीचा हा शेवटचा आयपीएल असल्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. त्यामुळे चेन्नईने हा सामना जिंकून यंदाचं जेतेपद आपल्या नावावर करावं असं चेन्नई चाहत्यांची इच्छा आहे. आयपीएलमधील सर्व नियम पाहिल्यावर गुजरात म्हणजे हार्दिक पांड्याचं पारड जड आहे.  गुणतालिकेत  गुजरात पहिल्या स्थानावर आहे.