‘टीम इंडियात मुस्लीम खेळाडू नाही, आयपीएसवर भज्जी भडकला...

न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आणि श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. मात्र या संघनिवडीपूर्वी गुजरातचे निलंबीत आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी केलेल्या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघात मुस्लीम खेळाडू दिसत नसल्याचे ट्वीट करणाऱ्या आयपीएस भट यांचा टर्बोनेटर भज्जीने समाचार घेतला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 24, 2017, 05:07 PM IST
 ‘टीम इंडियात मुस्लीम खेळाडू नाही,  आयपीएसवर भज्जी भडकला... title=

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आणि श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. मात्र या संघनिवडीपूर्वी गुजरातचे निलंबीत आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी केलेल्या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघात मुस्लीम खेळाडू दिसत नसल्याचे ट्वीट करणाऱ्या आयपीएस भट यांचा टर्बोनेटर भज्जीने समाचार घेतला आहे.

आयपीएस संजीव भट (Sanjiv Bhatt) यांनी फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी ‘सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमध्ये कोणी मुस्लीम खेळाडू आहे का? स्वातंत्र्यानंतर असे किती वेळा झाले आहे की संघामध्ये मुस्लीम खेळाडू नाही? मुस्लीम खेळाडूंनी क्रिकेट खेळणे बंद करावे का? संघाची निवड करणारे कोणत्या तरी दुसऱ्या खेळाचे नियम पाळत आहेत का?’असे प्रश्न उपस्थित केले आहे.

 

क्रिकेटला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयपीएस भट यांना हरभजन सिंहने फैलावर घेतले आहे. भट यांच्या ट्विटला उत्तर देताना भज्जीने लिहिले आहे की, ‘हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई यांच्यात भाऊबंदकी आहे. क्रिकेट संघाकडून खेळणारा प्रत्येक खेळाडू हा भारतीय आहे. त्यामुळे त्यांच्या धर्माच्या आणि जातीच्या गोष्टी करू नये. (जय हिंद).’

दरम्यान, असा प्रश्न विचारण्यापूर्वी निलंबित आयपीएस अधिकाऱ्यांनी घोषीत झालेल्या टीम इंडियाची लिस्ट वाचली नसावी.  श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यांसाठी मोहम्मद शामी आणि न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० सिरीजसाठी मोहम्मद शिराज याची निवड करण्यात आली आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ 

विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मुरली विजय, रोहित शर्मा, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमन साहा, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्या, उमेश यादव

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नहेरा, मोहम्मद सिराज