INDvsAUS: सुरक्षा भेदून भेटायला आलेल्या फॅनसोबत धोनीची 'पकडापकडी'

स्टेडियममध्ये सुरक्षा भेदून भेटायला येणारा चाहता काही धोनीसाठी नवीन नाही.

Updated: Mar 5, 2019, 08:17 PM IST
INDvsAUS: सुरक्षा भेदून भेटायला आलेल्या फॅनसोबत धोनीची 'पकडापकडी' title=

नागपूर : स्टेडियममध्ये सुरक्षा भेदून भेटायला येणारा चाहता काही धोनीसाठी नवीन नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेवेळीही असाच प्रकार घडला. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर धोनीचा एक चाहता त्याला सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन भेटायला आला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॅटिंग झाल्यानंतर भारतीय टीम फिल्डिंगला आलेली असताना ही घटना घडली.

जामठा स्टेडियमची सुरक्षा भेदून एक जण आपल्या मागे पळत येत असल्याचं धोनीला दिसलं. मग धोनीनंही या चाहत्यासोबत पकडापकडी खेळायला सुरुवात केली. धोनीच्या या चाहत्यानंही माघार घेतली नाही. धोनी जसा मैदानात पळत होता तसाच हा फॅनही त्याच्या मागे पळत होता. अखेर खेळपट्टी जवळ आल्यानंतर धोनी थांबला आणि त्याच्या फॅनला भेटला.

MS Dhoni started running

धोनीला भेटल्यानंतर चाहत्यानं लगेचच त्याचे पाय धरण्याचा प्रयत्न केला. यानंतर या चाहत्यानं धोनीला मिठीही मारली आणि हात मिळवला.

MS Dhoni is too fast

धोनीला भेटल्यानंतर हा चाहता विराट कोहलीच्या दिशेनं जाऊ लागला. पण विराट कोहली मात्र हा सगळा प्रकार बघून फारसा आनंदी दिसला नाही. अखेर सुरक्षा रक्षकांनी या चाहत्याला पकडलं आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले.

Dhoni finally stops

या चाहत्याच्या टी शर्टच्या मागे धोनीच्या जर्सीमागे असलेला ७ नंबर होता. तर या चाहत्याच्या टी शर्टवर थला असं लिहिलं होतं.

The fan finally gets the hug

दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २५१ रनचं आव्हान दिलं. या मॅचमध्ये धोनी पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. विराट कोहलीच्या शतकामुळे या मॅचमध्ये भारताला २५० रनचा टप्पा गाठता आला. विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे ४०वं शतक होतं.

The fan was then escorted off the field