नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं ११६ रनची झुंजार खेळी केली. विराट कोहलीचं वनडेमधलं हे ४०वं शतक होतं. वनडे क्रिकेटमध्ये आता विराटच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे. सचिननं वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतकं केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं विराटचं हे ६५वं शतक होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण शतकांच्या बाबतीत १०० शतकांसह सचिन पहिल्या आणि ७१ शतकांसह रिकी पाँटिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
१ विराट कोहलीचं हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचं सातवं शतक आहे.
२ विराट कोहलीनं सर्वाधिक आठ शतकं श्रीलंकेविरुद्ध केली आहेत.
३ विराटचं भारतातलं हे १८वं शतक आहे. तर परदेशात विराटनं २२ शतकं केली आहेत.
४. विराटनं १३ देशांविरुद्ध वनडे मॅच खेळल्या, यातल्या ९ देशांविरुद्ध विराटनं शतक केलं.
५ विराटचं २०१९ मधलं हे दुसरं शतक आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्येही विराटनं शतक केलं होतं.
६ विराट कोहलीनं सर्वाधिक ६-६ शतकं २०१७ आणि २०१८ मध्ये केली होती.
७ विराटला त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त २००८ सालीच एकही शतक करता आलं नव्हतं. २००८मध्ये विराट ५ मॅच खेळला होता.
८ विराटचं कर्णधार असताना हे १८वं शतक आहे. धोनी कर्णधार असताना विराटनं १९ शतकं केली होती.
९ विराटनं ज्या ३९ मॅचमध्ये शतकं केली यातल्या ३२ मॅचमध्ये भारताचा विजय झाला. (४०व्या शतकाचा यामध्ये समावेश नाही)
१० विराटनं ३३ शतकं तिसऱ्या क्रमांकावर आणि सात शतकं चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना केली आहेत.