Viral Video : 'या' तरुणीने खुल्लमखुल्ला Virat Kohli ला केलं KISS! अनुष्का बघतच राहिली

Virat Kohli Viral Video :  विराट कोहलीला KISS करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनुष्का शर्माला धक्का बसला आहे. 

Updated: Feb 21, 2023, 12:53 PM IST
 Viral Video : 'या' तरुणीने खुल्लमखुल्ला Virat Kohli ला केलं KISS! अनुष्का बघतच राहिली title=
Watch girl kiss virat kohli Anushka Sharma Shock Video Viral on Social media now Trending

Virat Kohli Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामधील दिल्लीत रंगलेल्या सामन्यानंतर विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ तुफान व्हायरल  (Social media) होतो आहे. या व्हिडीओनंतर विराट कोहलीने जेवणासाठी खास छोले भटुरे  (chhole bhature) मागवले होते, असी चर्चा रंगली आहे. त्यानंतर विराटचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्याने खुल्लम खुल्ला अनुष्का (Anushka Sharma) नाही तर एका दुसऱ्या तरुणीला किस केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) वाऱ्यासारखा पसरला आहे. विराट कोहलीबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. माजी भारतीय कर्णधाराची फॅन फॉलोइंग भारताव्यतिरिक्त जगभरात आहे. विराट कोहली कुठेही गेला तरी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमते. (Trending Video)

अन् विराटने तिला किस केली...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती महिला विराट कोहलीला किस करतेय. थांबा हा व्हिडीओ नीट बघा...तो विराट कोहली नाही तर त्याचा पुतळा आहे. ती महिला विराट कोहलीच्या पुतळ्याला किस करते आहे. पुतळ्याला किस करतानाचा व्हिडीओ बनविण्यात आला आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Watch girl kiss virat kohli Anushka Sharma Shock Video Viral on Social media now Trending)

विराटच्या खेळाबद्दल बोलायचं तर..

विराट कोहली सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत कांगारूंचा पराभव केला. त्याचवेळी, आता या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 1 मार्चपासून खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया 

रोहित शर्मा (क), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.