वीरेंद्र सेहवागने दिल्या अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे.

Updated: Oct 11, 2017, 03:16 PM IST
वीरेंद्र सेहवागने दिल्या अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा  title=

मुंबई : बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे.

बिग बी यांच्यावर जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यानेदेखील बीग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.  

 

 काही वैयक्तिक कारणांस्तव बीग बी यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत अशी माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. 

 बॉलिवूडचा शहेनशहा बनलेल्या बीग बींचा उत्साह तरूणांनाही लाजवणार आहे. त्यांचे हिंदी सिनेमात पदार्पणापूर्वी काही ठिकाणी नोकरी त्यानंतर व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट असा प्रवास होता.'जंजीर' या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांचे आयुष्यचं बदलले. लहान आणि मोठ्या पडद्यावरही त्यांनी काम केले. 
 
 पद्मश्री, पद्म भूषण, पद्म विभूषण यासारख्या यासारख्या पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले आहे.