मुंबई : आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपरकिंग्जसंदर्भात मोठा निर्णय घेतला. धोनीने टीमचं कर्णधारपद सोडले आणि आता या सिझनमध्ये रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. CSK चं नेतृत्व करणारा धोनी आणि सुरेश रैनानंतर जडेजा तिसरा क्रिकेटर असून तो एका नव्या युगाची सुरुवात करणार आहे. मात्र जडेजाकडे कर्णधारपदाची धुरा सोपवणं काहींना पटलेलं नाही
धोनीच्या अनुपस्थितीत सीएसकेचे नेतृत्व करणारा सुरेश रैना हा एकमेव खेळाडू होता. मात्र आता धोनीने कर्णधारपदावरून पायऊतार होत रविंद्र जडेजाकडे कमान सोपवली आहे. यावर विराट कोहलीच्या बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
खेलनीती पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर बोलताना राजकुमार शर्मा यांनी सांगितलं की, "जडेजा जगातील अव्वल खेळाडूंपैकी आहे यामध्ये कोणतीही शंका नाही. पण, त्याने कधी कर्णधारपद भूषवलं नाही आणि त्याला तेवढा अनुभव देखील नाही. एक चांगला क्रिकेटपटू चांगला कर्णधार असतोच असं नाही."
बराच काळापासून जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. त्यामुळे त्याला त्याला टीमचं मॅनेजमेंट कसं कसे करायचं याची कल्पना असेल. माजी कर्णधार एमएस धोनी देखील त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करेल, असंही शर्मा यांनी सांगितलं आहे.
आजपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आजपासून 29 मे पर्यंत चाहते आयपीएलचा फिवर पहायला मिळणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. रविंद्र जडेजा पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जच्या टीमचं नेतृत्व करणार आहे.