कोहली, रहाणेने अशी लुटली 'ऑलराऊंडर' च्या खेळाची मज्जा

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक पंड्याने शतक लगावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे पंड्याने तीनही फॉर्मॅटमध्ये स्वत: ला सिद्ध केले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 14, 2017, 06:45 PM IST
 कोहली, रहाणेने अशी लुटली 'ऑलराऊंडर' च्या खेळाची मज्जा title=

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक पंड्याने शतक लगावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे पंड्याने तीनही फॉर्मॅटमध्ये स्वत: ला सिद्ध केले आहे. 

आठव्या नंबर खेळायला आलेल्या पंड्याने शतक करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले. त्याचसोबत अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड मोडीत काढले. संपूर्ण टीमने उभे राहून पंड्याच्या खेळीला दाद दिली. यावेळी संपूर्ण टीम त्याच्या खेळाचा आनंद घेत होती. खासकरुन विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे पंड्याच्या खेळाची मज्जा लूटली.

सोशल मीडियावर सध्या पंड्याच्या खेळीचा १ मिनीटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये कोहली रहाणेला खेचून खेचून पंड्याने मारलेले शॉट्स दाखवत असल्याचे दिसत आहे. या कसोटीतून टीम इंडियामध्ये एक नवा ऑलराउंडरचा जन्म झाल्याने सर्वजण आनंदात आहेत.