शतक ठोकल्यानंतर खेळाडू का करत होते 'V'ची खूण, झाला खुलासा

श्रीलंकेविरोधात भारताने ३ सामन्याच्या सिरीजमध्ये ३-० ने विजय मिळवला. मॅचमध्ये सध्या एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे 'v' अशी खूण केल्याची. 

Updated: Aug 14, 2017, 05:45 PM IST
शतक ठोकल्यानंतर खेळाडू का करत होते 'V'ची खूण, झाला खुलासा title=

नवी दिल्ली : श्रीलंकेविरोधात भारताने ३ सामन्याच्या सिरीजमध्ये ३-० ने विजय मिळवला. मॅचमध्ये सध्या एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे 'v' अशी खूण केल्याची. 

शतक ठोकल्यानंतर पांड्याने दोन्ही हात वर करुन V अशी खूण केली. शतक पूर्ण होताच हेल्मेट आणि बॅट ग्राउंडवर ठेवली आणि दोन्ही हात वर करुन v ची खूण केली. याआधी शिखर धवनने देखील शतक झाल्यानंतर अशाच प्रकारे खूण करुन विजयाचं सेलिब्रेशन केलं.

फक्त शिखर धवनच नाही तर केएल राहुलने देखील अशाच अंदाजात सेलिब्रेशन केलं. शत ठोकल्यानंतर टीम इंडियाच्या या V खूण करण्यामागचं कारण काय याचा प्रश्न अनेकांना पडला. याबाबत धवनने खुलासा केला आहे.

शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत याबाबत खुलासा केला आहे. त्याने म्हटलं आहे की, 'हार्दिक पांड्याचं पहिलं शतक. आमच्या डॅडी डी पोजची मजा घे.'

शिखर धवनने सांगितलं की, हे सोबतच्या खेळाडूंसाठी एक संदेश होता. ज्याला त्यांनी एक नवं नाव दिलं आहे. पण त्याने ते नाही सांगितलं की ते नवीन नाव काय आहे. शिखर धवनने हार्दिक पांड्या आणि के एल राहुलला टॅग करत एका गोष्टीचा हवाला दिला ज्याबद्दल शनिवार रात्री खेळाडू बोलत होते.

 

First of many more to come my boy @hardikpandya93 Enjoyed our Daddy D pose @rahulkl 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

 

For u boys @rahulkl @hardikpandya93 ..spoke abt it lastnite and happnd today

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on