Virat Kohli : दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यात फाफ ड्यू प्लेसिसने (Faf du Plessis) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी आरसीबीचा स्टार प्लेअर विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये किंग कोहली (King Kohli) एका व्यक्तीच्या पाया पडताना दिसतोय. दरम्यान हा व्यक्ती नेमका कोण आहे, याबाबत सर्वांना प्रश्न पडलाय.
विराट कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये विराट कोहली राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांच्या पाया पडताना दिसतोय. दरम्यान राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) हे दुसरे तिसरे कोणीही नसून विराट कोहलीच्या बालपणीचे कोच आहेत.
रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा दिग्गज फलंदाज विराट कोहली त्याच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच दिल्लीच्या मैदानावर सामना खेळतोय. दिल्ली विरूद्धच्या या सामन्यापूर्वी विराट कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा मैदानावर पोहोचले होते.
यावेळी विराट कोहली त्यांना पाहताच त्यांच्याकडे आला आणि त्याने राजकुमार यांच्या पायाला स्पर्श केला. कोहलीच्या या कृत्याने कोच देखील सुखावले. त्यांनी लगेच कोहलीच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला थाप दिला. काही वेळ चर्चा केल्यानंतर कोहली पुन्हा सराव करण्यासाठी निघून गेला. दरम्यान कोहलीचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना मात्र फारच आवडला आहे.
A wholesome meet & greet @imVkohli catches up with his childhood coach #TATAIPL | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/YHifXeN6PE
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
आजच्या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर फाफ डू प्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी केदार जाधवचा बंगळुरूच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश कऱण्यात आलाय. नुकतंच रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या ताफ्यात केदारचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये कॉमेंट्रीनंतर तो थेट आयपीएल सामन्यात खेळताना दिसणार आहे.
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिले रुसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार
विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा