घे बॉलचा वास घे...! खराब फिल्डींगमुळे Virat Kohli ने केएल राहुलसोबत पाहा काय केलं?

विराट कोहलीने विकेटकीपर केएल राहुल (KL Rahul) भर मैदानात खिल्ली उडवली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Video Viral) होतोय. 

Updated: Jan 12, 2023, 07:28 PM IST
घे बॉलचा वास घे...! खराब फिल्डींगमुळे Virat Kohli ने केएल राहुलसोबत पाहा काय केलं? title=

Kl Rahul Bad Fielding : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज सुरु आहे. यामधील दुसरा वनडे (India vs SL 2nd ODI) सामना कोलकात्याला खेळवला जातोय. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी (India Bowlers) श्रीलंकेच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली आहे. मात्र या दरम्यान एक मजेशीर घटना घडली. श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना विराट कोहलीने विकेटकीपर केएल राहुल (KL Rahul) भर मैदानात खिल्ली उडवली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Video Viral) होतोय. 

Virat Kohli ने घेतली केएल राहुल फिरकी

श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना 10 ओव्हर फेकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला. यावेळी पहिला बॉल टाकल्यावर तो कुशल मेंडीसच्या बॅटला न लागता थेट विकेटकीपर केएल राहुलकडे गेला. यावेळी तो बॉल राहुलने पकडला खरा, मात्र त्याने दिलेल्या रिएक्शनवरून त्याला तो बॉल पकडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला असल्याचं दिसलं. 

दरम्यान या घटनेनंतर भारतीय टीमचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने केएल राहुलची मजा घेतली आहे. यावेळी विराटने राहुलला बॉलचा वास दिला. कोहली आणि राहुलची ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. इतकंच नाही तर कोहलीचं हे कृत्य पाहून रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज देखील हसू रोखू शकले नाहीत.

श्रीलंका 215 वर ऑल आऊट

श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने (dasun shanaka) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र श्रीलंकेची सुरूवात चांगली झाली नव्हती. श्रीलंकेकडून अविष्का फर्नाडों (avishka fernando) आणि नुवांदु फर्नांडो सलामीला उतरले होते.मात्र श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नाडों 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कुसल मेंडीसने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनी काही अंशी डाव सांभाळला तर होता मात्र त्यांना मोठ्या धावसंख्या गाठता आली. 

कुसल मेंडीस 34 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुनिथ वेलालगेने 32 धावा केल्या होत्या. तर नुवांदु फर्नांडोने अर्धशतक ठोकले आहे.या खेळाडूं व्यतिरीक्त एकाही खेळाडूचा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. आणि श्रीलंकेचा संघ 39.4 ओव्हरमध्ये 215 वर ऑल आऊट झाला. 

टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, कुलदिप यादवने (Kuldeep yadav) प्रत्येकी 3 विकेट घेतल्य़ा आहेत. तर उमरान मलिकने 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली आहे.