कॅप्टन विराट संदर्भात सेहवागने केलं मोठं वक्तव्य

टीम इंडियाचा माजी स्फोटक बॅट्समन असलेल्या वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 13, 2018, 11:03 PM IST
कॅप्टन विराट संदर्भात सेहवागने केलं मोठं वक्तव्य title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी स्फोटक बॅट्समन असलेल्या वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. 

वीरेंद्र सेहवागनेही टीमची निवड आणि विराट कोहली याच्यावर भाष्य केलं आहे. जर, दुसऱ्या टेस्ट मॅचमध्येही कॅप्टन विराट कोहली अयशस्वी ठरला तर त्याला टीममधून बाहेर बसवलं पाहिजे असं वक्तव्य सेहवागने एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना केलं आहे.

सेहवागने म्हटलं की, शिखर धवनला केवळ एका टेस्ट मॅचमध्ये अपयश आल्याने आणि भुवनेश्वरला कुठलंही कारण नसताना टीममधून बाहेर बसवलं. त्यामुळे आता विराट कोहलीचं प्रदर्शन सेंच्युरियनमध्ये चांगलं नसेल तर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये त्याने टीममधून बाहेर बसावं.

भुवनेश्वर कुमारला टीममधून बाहेर ठेवण्याचा निर्णय अयोग्य होता. इशांत शर्माला त्याच्या उंचीमुळे फायदा होऊ शकतो. या निर्णयामुळे विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारचा आत्मविश्वास कमी केला आहे. इतर कुठल्याही बॉलरच्या जागेवर इशांत शर्माला खेळवता आलं असतं. भुवनेश्वरने केपटाऊनमध्ये चांगलं प्रदर्शन दाखवलं होतं त्यामुळे त्याला टीममधून बाहेर बसवण्याचा निर्णय योग्य नाहीये असंही सेहवागने म्हटलं आहे.