न्यूझीलंडविरोधात पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, मात्र हा व्यक्ती झाला मालामाल

न्यूझीलंडच्या टीमने पाकिस्तानवर विजय मिळवला. या वन-डे मॅचमध्ये पाकिस्तानचा १८३ रन्सने लाजीरवाणा पराभव झाला. मात्र...

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 13, 2018, 09:57 PM IST
न्यूझीलंडविरोधात पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, मात्र हा व्यक्ती झाला मालामाल title=
Image: Twitter

नवी दिल्ली : ट्रेंट बोल्ट याने केलेल्या जबरदस्त बॉलिंगमुळे न्यूझीलंडच्या टीमने पाकिस्तानवर विजय मिळवला. या वन-डे मॅचमध्ये पाकिस्तानचा १८३ रन्सने लाजीरवाणा पराभव झाला. मात्र, ही मॅच पहायला गेलेला एक व्यक्ती मालामाल झाल्याचं समोर आलं आहे.

न्यूझीलंडच्या टीमने बॅटिंग करत ५० ओव्हर्समध्ये २५७ रन्सपर्यंत मजल मारली. मार्टिन गुप्टिलने ६२ बॉल्समध्ये ४५ रन्स केले. कॅप्टन केन विलियमसनने १०१ बॉल्समध्ये ७३ रन्स केले. रॉस टेलरने ५२ रन्स आणि टॉम लैथमने ३५ रन्स केले. 

न्यूझीलंडच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेली पाकिस्तानची संपूर्ण टीम ७४ रन्सवर ऑल आऊट झाली. मात्र, या मॅच दरम्यान एका व्यक्तीने तब्बल लाखो रुपये कमवल्याचं समोर आलं आहे. पाहूयात काय आहे हा प्रकार...

भलेही पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव झाला असेल मात्र, मॅच पहायला गेलेल्या न्यूझीलंडमधील एका व्यक्तीने लाखो रुपये कमावले आहेत.

New zealand

मॅच दरम्यान आयोजित स्पर्धेत एका व्यक्तीने कॅच पकडत बक्षीस जिंकलं आहे. या बक्षीसाची रक्कम ५० हजार डॉलर म्हणजेच ३१ लाख ८० हजार ५२५ रुपये मिळाले आहेत. 

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान वन-डे मॅच दरम्यान मैदानात एक स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेतील नियमानुसार, जो व्यक्ती एका हाताने कॅच पकडेल त्याला बक्षीस मिळणार होतं. त्याप्रमाणे बाऊंड्रीलाईनबाहेर बसलेल्या एका प्रेक्षकाने क्रिकेटर्सने मारलेल्या बॉलची एका हाताने कॅच पकडली आणि विजेता ठरला. न्यूझीलंड क्रिकेट या स्पर्धेचं आयोजन करतं.

यामध्ये एक अट अशीही आहे की, प्राईज मनीसाठी प्रमोशनल टी-शर्टही परिधान करणं गरजेचं आहे.