विराट कोहलीची सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं.

Updated: Aug 21, 2018, 09:45 PM IST
विराट कोहलीची सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी title=

नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं. १९७ बॉलमध्ये १० फोरच्या मदतीनं विराटनं हे शतक पूर्ण केलं. टेस्ट क्रिकेटमधलं विराटचं हे २३वं शतक होतं. या शतकाबरोबरच विराटनं विरेंद्र सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं लगावणाऱ्या भारतीयांच्या यादीमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

विराट कोहलीनं ११८ इनिंगमध्ये २३ शतकं केली आहेत. तर सेहवागला एवढीच शतकं करायला १७८ इनिंग लागल्या. सचिन तेंडुलकर हा सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू आहे. सचिननं ३२९ इनिंगमध्ये ५१ शतकं केली. तर राहुल द्रविड या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडनं २८४ इनिंगमध्ये ३६ शतकं केली. सुनिल गावसकर २१४ इनिंग आणि ३४ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.