नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक झळकवलं. विराटच्या शतकामुळे भारत तिसरी टेस्ट जिंकू शकतो. विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे २३वं शतक होतं. विराटनं १९७ बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. विराट कोहलीचं हे शतक आणि सचिन तेंडुलकरचं एक शतक यांचा एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे.
विराट कोहलीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे ५८वं शतक आहे(२३ टेस्ट शतकं आणि ३५ वनडे शतकं) आहे. सचिन तेंडुलकरचं ५८वं शतकही १०३ रनचंच होतं. आणि सचिननं हे शतक झळकवायला १९७ बॉलच खेळले होते.
सचिननं २००१ साली इंग्लंडविरुद्धचं अहमदाबादमध्ये ते शतक केलं होतं. सचिनचं ते शतक त्याच्या टेस्ट कारकिर्दीमधलं २७वं शतक होतं. तर त्यावेळी सचिननं वनडेमध्ये ३१ शतकं केली होती.